शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

जनहिताच्या विरोधातील सरकारला वठणीवर आणा

By admin | Updated: July 3, 2016 21:25 IST

हसन मुश्रीफ : यमगे येथे शेतकरी मेळावा, सत्कार समारंभ, पाणीपूजन कार्यक्रम

मुरगूड : अच्छे दिन आणण्याच्या नावाखाली सत्तेवर आलेले भाजपचे सरकार विविध शासकीय योजना धडाधड रद्द करत आहे. सर्वसामान्यांना मिळणारे केरोसिन, स्वस्त धान्य, आरोग्य सेवा, बांधकाम कामगारांच्या योजना, आदींना खो घालून या भाजप सरकारने आपण जनहिताच्या विरोधात असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे सरकारला उलथून टाकण्यास जरी अवधी असला, तरी आंदोलनाच्या माध्यमातून वठणीवर आणण्यासाठी जनतेने सज्ज राहावे, असे आवाहन माजी मंत्री व आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. यमगे (ता. कागल) येथे हसन मुश्रीफ फौंडेशनच्या माध्यमातून मारलेल्या तीन कूपनलिकांचे पाणीपूजन तसेच मान्यवरांचा सत्कार सोहळा व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘बिद्री’चे माजी संचालक शंकरराव पाटील होते. यावेळी यमगे गावासाठी मुश्रीफ यांनी निधी दिल्याबद्दल उपसरपंच मारुती पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दहावीमध्ये मुरगूड केंद्रात पहिला आलेला आशुतोष विभूते, सायली कांदळकर व बिरदेव डोणे यांचा सत्कार मुश्रीफांच्या हस्ते पार पडला. राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष शामराव पाटील यांनी स्वागत केले, तर माजी सरपंच शिवाजीराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. मेळाव्यास युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, सरपंच सुजाता पाटील, शंकरराव किल्लेदार, माजी उपसरपंच अशोक हुल्ले, मोहन किल्लेदार, चंद्रकांत कांदळकर, बी. के. साठे, राजू सावंत, हरिभाऊ कुंभार, मुरगूड बँकेचे संचालक साताप्पा पाटील, रणजित पाटील, दत्ता पाटील, शोभा गुरव, परशराम डोणे, विजया कुंभार, संदीप पाटील, तानाजी कुंभार, आदी प्रमुख उपस्थित होते. जहाँगीर नायकवडी यांनी आभार मानले.