संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:22 IST2021-05-01T04:22:03+5:302021-05-01T04:22:03+5:30

इचलकरंजी : रुई (ता.हातकणंगले) येथील सह्याद्री फाउंडेशनने आज, शनिवारी रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. रक्तदानास येतेवेळी नागरिकांनी नियमांचे पालन ...

Brief news | संक्षिप्त बातम्या

संक्षिप्त बातम्या

इचलकरंजी : रुई (ता.हातकणंगले) येथील सह्याद्री फाउंडेशनने आज, शनिवारी रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. रक्तदानास येतेवेळी नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.

.........

बॉडी रॅपेअरचे किट प्रदान

इचलकरंजी : कोरोना संकटात सामाजिक बांधिलकी जपत उत्तम कुंभार यांनी आयजीएमसह गरजूंना मदत केली. रुग्णालयास २० बॉडी रॅपेअरचे किट आणि २०० हॅण्डग्लोज दिले. तसेच निराधारांना अन्नदान करणाऱ्या माणुसकी फाउंडेशनला फूड पॅकेट दिले. यावेळी विशाल पोवार, युवराज पाटील, संजय कुंभार, रमेश खांडेकर आदी उपस्थित होते.

..........

माथाडी कामगारांना लसची व्यवस्था करावी

इचलकरंजी : कोरोनातही नियमितपणे जीव धोक्यात घालून माथाडी कामगार काम करीत आहेत. कामगारांना शासनाने तिष्ठत न राहता तातडीने लस देण्याची व्यवस्था करावी, अशा मागणीचे पत्र इंटकने जिल्हाधिकारी व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यांना दिले.

Web Title: Brief news