शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना महामारीतही लाचखोरी जोरात; महसूल सर्वात पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनाच्या महामारीमुळे सर्वसामान्यांचे जीवन उद‌्ध्वस्त झालेले असताना लाचखोरांची चलती मात्र कायम असल्याचे चित्र गेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोनाच्या महामारीमुळे सर्वसामान्यांचे जीवन उद‌्ध्वस्त झालेले असताना लाचखोरांची चलती मात्र कायम असल्याचे चित्र गेल्या सव्वातीन वर्षातील कारवाईवरून दिसून येते. या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने तब्बल ९९ जणांना लाच घेताना रंगेहाथ पकडले तर २००हून अधिक जणांना गजाआड करण्यातही यश आले. गेल्या १५ महिन्यात जिल्ह्यात ३४ जणांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यामध्ये लाचखोरीत महसूल खाते सर्वात अग्रेसर राहिले आहे.

कोरोना महामारीमुळे सारेच संकटात आहेत, त्यात सर्वसामान्यांची रोजी रोटी थांबली, अनेकांच्या हाताला काम नाही, अनेकांच्या नोकऱ्याही गेल्या अशा अवस्थेत सर्वसामान्य माणून हवालदिल झालेला असताना त्याच्या शासकीय कार्यालयातील कामावरही ‘मलई’ मिळवण्यात हे शासकीय नोकरदार आघाडीवर राहिले. शासकीय व निमशासकीय कार्यालयातही सर्वसामान्यांची अडवणूक अद्याप थांबलेली नाही. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी दाखल होऊन कारवाई केली जात असलीतरी लाचखोरीचा आलेख नेहमीच चढता राहिला आहे.

कोल्हापूर विभागाने गेल्या १५ महिन्यात केलेल्या कारवाईत प्रथम वर्गातील सहा बड्या अधिकाऱ्यावर लाचप्रकरणी कारवाई केली. यामध्ये मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याला तब्बल २० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. इतक्या मोठ्या रकमेचे लाच प्रकरण जिल्ह्यात प्रथमच घडल्याचे निदर्शनास आले. १५ महिन्यात लाचखोरीत १२ पंटर (खासगी व्यक्तीं)चा वापर केला, त्यांच्यावरही कारवाई केली.

लाचखोरीत महसूल अव्वल, पोलीसही जाळ्यात

जिल्ह्यात गेल्या १५ महिन्यातील लाचखोरीच्या कारवाईत महसूल विभाग अव्वल ठरला. महसूलमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नऊ जणांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. तर त्यामध्ये ११ जणांवर कारवाई केली. याशिवाय दुसऱ्या क्रमांक पोलिसांचा लागतो. पोलीस विभागाच्या लाचखोरीच्या तब्बल ७ कारवाई झाल्या. त्यामध्ये १३ जणांवर अटकेची कारवाई झाली. याशिवाय जिल्हा परिषद, वीज मंडळ व आरोग्य विभागातही लाचखोरीचे प्रमाण अधिक असल्याचे कारवाईतून दिसून आले.

कोरोनाकाळात ‘महसूल’ची वरकमाई जोमात

- महसूल : ०९

- पोलीस : ०७,

- भूसंपादन : ०१

- जिल्हा परिषद : ०३

- वीज मंडळ : ०६

- मुद्रांक : ०१

- पशुवैद्यकीय विभाग : ०१

- वनविभाग : ०१

- आरोग्य विभाग : ०२

- आयकर विभाग : ०१

- मृदा व जलसंधारण : ०१

- होमगार्ड विभाग : ०१

कोणत्या वर्षी किती कारवाई

- २०१८ : ३४

- २०१९ : ३१

- २०२० : २७

- २०२१ : ०७ (जाने. ते मार्चअखेर)

कोट...

लाचविरोधी तक्रार देण्यासाठी प्रथम सर्वसामान्यांनी निर्भयपणे पुढे येण्याची गरज आहे. शासकीय- निमशासकीय कार्यालयातील कोणत्याही कर्मचारी अगर अधिकाऱ्याकडून लाचेच्या रकमेशिवाय कामाची अडवणूक होत असेल तर त्याविरोधी तक्रार द्यावी. तक्रारदाराचे कोणतेही काम थांबणार नाही. पुणे विभागात कोल्हापूरचे काम कौतुकास्पद आहे - आदिनाथ बुधवंत, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर.