शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही ‘संजय’ कागलात एकत्रितच लढणार

By admin | Updated: November 27, 2015 01:04 IST

मंडलिक-संजय घाटगेंचा निर्णय : विधान परिषदेचा फैसला ९ डिसेंबरला

कोल्हापूर : कागल तालुक्याच्या राजकारणात सर्व निवडणुका मंडलिक-संजय घाटगे गट म्हणूनच एकत्रित लढविण्याचा निर्णय कागल तालुक्यातील प्रा. संजय मंडलिक व माजी आमदार संजय घाटगे गटाच्या बुधवारी रात्री झालेल्या बैठकीत घेण्यात आला. विधानपरिषद निवडणुकीत कुणाला पाठिंबा द्यायचा हे नऊ डिसेंबरला जाहीर करण्यात येणार आहे. या दोन्ही गटाला मानणारी तालुक्यात चौदा मते असून त्यांना या निवडणुकीत चांगलेच महत्त्व आले आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत नऊ डिसेंबरपर्यंत आहे. तोपर्यंत राजकीय चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे त्यादिवशी पाठिंबाचा निर्णय घेण्याचे ठरले.व्हनाळी (ता. कागल) येथे घाटगे यांच्या घरी बुधवारी दोन्ही गटांच्या नेत्यांसह जिल्हा परिषद सदस्य, सभापती व प्रमुख कार्यकर्त्यांना घाटगे यांनी स्नेहभोजन ठेवले होते. कागलच्या राजकारणात गेल्या काही वर्षांपासून मंडलिक-संजय घाटगे एकत्र आहेत; परंतु कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या राजकारणात राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी संजय मंडलिक यांना सत्तारुढ पॅनेलमध्ये घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. तालुक्यातील भविष्यातील राजकारणात मंडलिक कुणाबरोबर राहणार, अशीही चर्चा गेल्या काही दिवसांत सुरू होती. त्याचाही खुलासा या बैठकीत झाला. भविष्यातील सर्व निवडणुका आपण एकत्रित गट म्हणूनच लढविणार असल्याचे प्रा. मंडलिक यांनी स्पष्ट केले.जिल्ह्णाच्या राजकारणात मंडलिक गट खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात आहे. कारण लोकसभेला संजय मंडलिक विरुद्ध धनंजय महाडिक अशी लढतच झाली आहे. त्यामुळे विधान परिषदेला ते आमदार महादेवराव महाडिक यांना पाठिंबा देण्याची शक्यता नाही. संजय घाटगे यांचा मुलगा ‘गोकुळ’मध्ये संचालक असला तरी तो माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी पॅनेलमध्ये घेतल्याने निवडून आला आहे. त्यामुळे हे दोघेही काँग्रेसची उमेदवारी सतेज पाटील यांना मिळाल्यास जरी ते शिवसेनेचे असले तरी सतेज पाटील यांच्याच मागे राहण्याची शक्यता गडद आहे. मंडलिक यांच्यासोबत राजेखान जमादारही काम करतात. त्यांना मानणारी तीन मते मुरगूड नगरपालिकेत आहेत. त्यांनी अजून काही निर्णय घेतलेला नाही. कागल तालुक्यात आमदार मुश्रीफ यांना मानणारी कागल नगरपालिकेत दहा मते आहेत. राष्ट्रवादीने काँग्रेसला पाठिंबा दिला असल्याने काँग्रेसचा जो कुणी उमेदवार असेल त्यास ती मते मिळतील. मुरगूड नगरपालिकेत रणजित पाटील यांची नऊ मते आहेत. ‘गोकुळ’च्या सत्तेत आमदार महाडिक यांच्यामुळे ते अनेक वर्षे आहेत. त्यामुळे रणजित पाटील यांचा गट महाडिक यांच्या पाठीशी राहणार हे स्पष्टच आहे.संजय घाटगेंच्या उमेदवारीबाबत चर्चाया बैठकीनंतर गुरुवारी दिवसभर कागल तालुक्यात वेगळीच चर्चा सुरू राहिली. संजय घाटगे हेच विधानपरिषदेला अपक्ष म्हणून लढणार असून, त्यासाठीच ही बैठक झाल्याचे सांगण्यात येत होते. आमदार महाडिक हे स्वत: निवडणूक न लढविता संजय घाटगे यांना पाठिंबा देणार आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व घाटगे यांचेही चांगले संबंध आहेत. त्यामुळे दोन्ही काँग्रेसमधील नाराज लोक व शिवसेना-भाजपची मदत घेऊन त्यांनी मैदानात उतरावे, असा चर्चेचा सूर होता असे सांगण्यात येत होते; परंतु अधिक चौकशी केली असता त्यात फारसे तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले.