पार्सल दिले नाही म्हणून दोघांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:21 IST2021-05-30T04:21:38+5:302021-05-30T04:21:38+5:30

या मारहाणीत स्वप्नील बाबसो चाळके, बाबासो तुकाराम चाळके (दोघे रा.जुने पारगाव) हे जखमी झाले. या प्रकरणी मेहबुब शिगावे, अमन ...

Both were beaten as the parcel was not delivered | पार्सल दिले नाही म्हणून दोघांना मारहाण

पार्सल दिले नाही म्हणून दोघांना मारहाण

या मारहाणीत स्वप्नील बाबसो चाळके, बाबासो तुकाराम चाळके (दोघे रा.जुने पारगाव) हे जखमी झाले. या प्रकरणी मेहबुब शिगावे, अमन शिगावे, अनिकेत, सूरज , मल्लीक (पूर्ण नाव माहीत नाही, सर्व रा. नवेपारगाव) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार नवे पारगांव येथील पप्पू मच्छी धाबा या हॉटेलमध्ये वरील संशयित हे शुक्रवारी (दि.२८) रात्री साडेदहा वाजता जेवणांचे पार्सल नेण्यासाठी आले होते.त्यांना पार्सल न दिल्यामुळे बाप लेकास जळणातील काठी घेऊन बेदम मारहाण करण्यात आली.यात बाबासो गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना वारणानगर येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.याप्रकरणी कोडोली पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला होता. आज तपासासाठी गुन्हा वडगावात पोलिसात वर्ग करण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक स्वाती सूर्यवंशी करीत आहेत.

Web Title: Both were beaten as the parcel was not delivered