शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
5
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
6
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
7
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
8
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
9
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
11
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
12
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
13
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
14
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
15
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
16
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
17
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
18
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
19
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
20
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
Daily Top 2Weekly Top 5

रशियन अभ्यासक्रमाद्वारे शिवाजी विद्यापीठाशी बंध दृढ  :द्मीत्री सकलोव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 10:49 IST

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील विदेशी भाषा विभाग हा भारत व रशिया यांच्यातील सांस्कृतिक बंध आहे. रशियन भाषा अभ्यासक्रमाच्या माध्यमातून ...

ठळक मुद्देरशियन अभ्यासक्रमाद्वारे शिवाजी विद्यापीठाशी बंध दृढ  :द्मीत्री सकलोवरशियन भाषेच्या विद्यार्थ्यांशी ‘मुक्त संवाद’

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील विदेशी भाषा विभाग हा भारत व रशिया यांच्यातील सांस्कृतिक बंध आहे. रशियन भाषा अभ्यासक्रमाच्या माध्यमातून हा बंध अधिक दृढ होत असल्याचे प्रतिपादन रशियातील मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटीचे प्रा. डॉ. द्मीत्री सकलोव यांनी येथे केले.विदेशी भाषा विभागातील रशियन भाषेच्या विद्यार्थ्यांशी ‘मुक्त संवाद’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डॉ. मागार्रिता रेमीजवा उपस्थित होत्या. या कार्यक्रमात रशियातील दैनंदिन जीवन, पाककला, कुटुंब व विवाहपद्धती यासंदर्भातील अनेक विषयांवर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. द्मीत्री सकलोव यांनी दिलखुलास उत्तरे दिली. त्यांनी खास रशियातून सोबत आणलेले ‘मत्र्योश्का’ही लाकडी बाहुली, काळा पाव आणि कॅव्हिअर या पदार्थांची ओळख त्यांनी विद्यार्थ्यांना करून दिली. त्याचबरोबर सोविएत व उत्तर-सोव्हिएत काळातील जीवनशैलीमधील फरक स्पष्ट केला.

रशियन लोकांना भारतातील निसर्ग अतिशय प्रिय असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. मागार्रीता रेमीजवा म्हणाल्या, रशियन स्त्रीने जीवनाच्या सर्व क्षेत्रात आज स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. ही स्त्री हे एक अतिशय कणखर व स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असल्याचे सांगितले. विभागप्रमुख डॉ. मेघा पानसरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सहयोगी शिक्षिका शीतल कुलकर्णी, प्रियांका माळकर उपस्थित होत्या.

 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकShivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर