शंकर धोंडी पाटील जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:24 IST2021-04-20T04:24:56+5:302021-04-20T04:24:56+5:30

या रक्तदान शिबिरात ७८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रारंभी एस. एम. जोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अभिजित पाटील यांनी स्वागत केले; ...

Blood donation camp on the occasion of Shankar Dhondi Patil's birthday | शंकर धोंडी पाटील जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

शंकर धोंडी पाटील जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

या रक्तदान शिबिरात ७८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

प्रारंभी एस. एम. जोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अभिजित पाटील यांनी स्वागत केले; तर राधानगरी तालुका संघाचे माजी प्रेसिडेंट, भोगावतीचे माजी संचालक वसंतराव पाटील यांच्याहस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी ७८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. कोल्हापुरातील संजीवन रक्तपेढीने रक्तसंकलन केले.

दरम्यान, शंकर धोंडी पाटील व मृणाल महिला दूध संस्था यांच्यावतीने दूध उत्पादक सभासद महिला व पुरुष यांना मास्कचे वाटप करण्यात आले. कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरच्या बरोबरीनेच मास्क किती महत्त्वाचा आहे, याबद्दलची माहिती पंचायत समितीच्या माजी सभापती वंदना पाटील यांनी दिली. यावेळी सरपंच जया पाटील, श्रद्धा पाटील, सचिव कृष्णात मिसाळ, राजाराम पाटील, श्रीकांत र्‍हाटवळ यांच्याहस्ते मास्कचे वाटप करण्यात आले.

Web Title: Blood donation camp on the occasion of Shankar Dhondi Patil's birthday