शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बेळगावात काळ्यादिनी युवकांचा एल्गार

By admin | Updated: November 2, 2016 01:14 IST

महापौर, उपमहापौरांची उपस्थिती : हजारो मराठी भाषिक सायकल फेरीत सहभागी

बेळगाव : बेळगावमध्ये काळ्यादिनानिमित्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने काढण्यात आलेल्या सायकल फेरीत पुन्हा एकदा मराठी अस्मितेचे दर्शन घडले. संभाजी उद्यानातून सायकल फेरीला सुरुवात झाली. यामध्ये हजारो मराठी भाषिक या काळ्या दिनाच्या सायकल फेरीत सहभागी झाले होते. गेली दोन वर्षे काळ्यादिनाच्या सायकल फेरीस दांडी मारणाऱ्या मराठी भाषिक महापौर, उपमहापौरांनी यावर्षी मात्र सायकल फेरीस हजेरी लावली. सकाळी ९ वाजता संभाजी उद्यानातून सायकल फेरीस सुरुवात झाली. नंतर बेळगाव उत्तर भागातील काही भाग, शहापूर भागातून पुढे मराठा मंदिरात रॅली विसर्जित करण्यात आली. आमदार चंद्रदीप नरके, जिल्हा शिवसेनाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्यासह कोल्हापूर मराठा क्रांती मोर्चाचे सुरेश दादा पाटील यांनी हजेरी लावली होती. महापौरांचे मौन कर्नाटक सरकार कारवाई करील या भीतीने गेली दोन वर्षांत माजी महापौर किरण सायनाक आणि महेश नाईक यांनी काळ्यादिनाच्या फेरीत सहभाग दर्शविला नव्हता. मात्र, यावर्षी महापौर सरिता पाटील फेरीत सहभागी झाल्या होत्या. तोंडावर काळीपट्टी बांधून त्या सामील झाल्या होत्या. तर उपमहापौर संजय शिंदे सायकल फेरीत सहभागी झाले होते. सोशल मीडिया आणि मराठा क्रांतीमुळे ऐतिहासिक गर्दी ठिकठिकाणी कानडी आस्मितेचे लाल, पिवळे ध्वज लावल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घोषणाबाजी करणाऱ्या मराठी युवकांवर बेळगाव पोलिसांनी सौम्य लाठीमार देखील केला. सोशल मीडियावरून जनजागृतीमुळे काळ्यादिनी ५० हजारांहून अधिक लोकांची गर्दी ऐतिहासिक ठरली आहे. युवकांना निर्णय प्रक्रियेत सामावून घ्या : दीपक पवार मराठा मंदिर येथे बोलताना मुंबई मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख दीपक पवार यांनी निर्णय प्रक्रियेत युवकांना सामावून घेतले, तर सीमालढ्याला आणखीन बळकटी येईल असे सांगितले. यावेळी आमदार संभाजी पाटील, माजी महापौर मालोजी अष्टेकर, दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर आदी नेते उपस्थित होते.