शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Mayor: महापौरपदी भाजपच्या रूपाराणी निकम, उपमहापौरपदी 'जनसुराज्य'चे अक्षय जरग विजयी

By भारत चव्हाण | Updated: February 6, 2026 12:32 IST

कोल्हापूरच्या इतिहासात प्रथमच महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकला

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या रूपाराणी संग्रामसिंह निकम यांची तर उपमहापौरपदी जनसुराज्य शक्ती पक्षाचे अक्षय विक्रम जरग यांची शुक्रवारी बहुमताने निवड झाली. निकम आणि जरग यांच्या निवडीने कोल्हापूरच्या इतिहासात प्रथमच महायुतीचा झेंडा फडकला आहे. निकम व जरग यांची बहुमताने निवड होताच त्यांच्या समर्थकांनी वाद्याच्या गजरात गुलालाची उधळण व फटाक्याची आतषबाजी करत एकच जल्लोष केला.

पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत रूपाराणी निकम यांना ४६ मते तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे सचिन मारुती शेंडे यांना ३५ मते पडली. त्यामुळे रूपाराणी निकम या विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले.

उपमहापौर पदाच्या निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे अक्षय विक्रम जरग यांनी काँग्रेसच्या दुर्वास परशुराम कदम यांचा पराभव केला. जरग यांना ४६ तर कदम यांना ३५ मते मिळाली. 

महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक ३४ जागा जिंकून देखील काँग्रेस पक्षाला सत्ता गमवावी लागली. निवडणुकीत काँग्रेससोबत असणाऱ्या उद्धवसेनेला केवळ एकच जागा मिळाल्याने सत्तेपर्यंत पोहोचण्यात त्यांना संख्याबळाची अडचण आली. या निवडणुकीच्या निमित्ताने खासदार धनंजय महाडिक यांच्या घराण्याने महानगरपालिकेच्या राजकारणात पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केले. तर आपल्या पक्षाचा महापौर करण्याचे भाजपचेही स्वप्न पूर्ण झाले.  

English
हिंदी सारांश
Web Title : BJP's Rupa Rani Nikam Elected Kolhapur Mayor; Akshay Jarg Deputy

Web Summary : Rupa Rani Nikam (BJP) is Kolhapur's mayor, Akshay Jarg (Jansurajya) deputy. The Mahayuti alliance won, defeating Congress despite their majority seats. Mahadik's family regained dominance; BJP realized its mayoral dream.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६MayorमहापौरMahayutiमहायुतीBJPभाजपा