शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
2
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
3
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
4
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
5
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
6
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
7
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
8
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
9
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
10
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
11
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
12
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
13
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
14
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
15
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
16
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
17
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
18
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
19
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
20
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सहकाराचे उच्चाटन हाच भाजपचा कार्यक्रम

By admin | Updated: August 18, 2015 22:11 IST

भाई जगताप यांचा आरोप : मुरगूड येथे विश्वनाथराव पाटील स्मृतिदिन

मुरगूड : सत्तेवर आलेल्या सरकारने सहकार समजून घेतलाच नाही. सहकार क्षेत्रावर काँग्रेसची घट्ट पकड आहे. त्यामुळेच या अधिवेशनामध्ये सहकाराचे उच्चाटन कसे करता येईल, यावर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. सहकार आणि काँग्रेसचे उच्चाटन करण्याचा एक कलमी कार्यक्रमच त्यांनी हातात घेतला आहे; पण सहकाराकडे सत्ताधिशांनो वाकडी नजर केलात, तर शेतकरीच तुम्हाला शेतात गाडेल, असा सज्जड दम कामगार नेते आमदार भाई जगताप यांनी दिला. मुरगूड (ता. कागल) येथे सहकार महर्षी विश्वनाथराव पाटील मुरगूड बँकेच्यावतीने आयोजित ‘सहकार आणि आजचे सरकार’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील होते. यावेळी माजी आम. बजरंग देसाई, माजी आम. नामदेवराव भाईटे, दादा जगताप, रणजितसिंह पाटील, प्रविणसिंह पाटील, नगराध्यक्षा वसुधा कुंभार उपस्थित होते. दलितमित्र डी. डी. चौगले यांनी प्रास्ताविक केले.माजी आम. बजरंग देसाई, रणजितसिंह पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. वसंतराव शिंदे, नावेद मुश्रीफ, श्रीपती पाटील, विश्वास चौगले, साताप्पा पाटील, संतोष वंडकर, विजय शेट्टी, एम. डी. रावण, मारुती कांबळे, धनंजय मिसाळ, संजय हावळ उपस्थित होते. (वार्ताहर)‘भाजप’ची क्रॉप्टनीती--सहकार क्षेत्रावर यांची पकड नसल्याने विविध संस्थांमध्ये घुसण्याची नवीन पद्धत या सरकारने अवलंबली आहे. मोठमोठ्या संस्थेत यांचे प्रतिनिधी आता क्रॉप्ट करून घुसत आहेत; पण चांगल्या संस्थांमध्ये मिठाचा खडा टाकून सहकारामध्ये बाधा येईल, असेही जगताप यांनी सांगितले.सहकारमंत्र्यांमुळेच साखरेचा दर उतरलामहाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात साखर उत्पादन होत असताना सहकारमंत्र्यांनी बाहेरून चाळीस हजार टन साखर आणण्याची घोषणा केली आहे. त्यामुळेच साखर दरात कमालीची घसरण झाली. सूडभावनेने जर हे सरकार वागल,े तर सहकार उद्ध्वस्त होईल, असा इशारा भाई जगताप यांनी दिला.