शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

महाडिकांना भाजपची ताकद

By admin | Updated: December 13, 2015 01:27 IST

सुरेश हाळवणकर : १०० मते मिळवून देणार, पाठिंबा जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा

 कोल्हापूर : विधान परिषदेच्या कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात होत असलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अपक्ष उमेदवार आमदार महादेवराव महाडिक यांना मदत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी घेतला आहे. त्यामुळे महाडिक यांच्या पारड्यात भाजपची जिल्ह्यातील १०० मते टाकली जातील, अशी माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. आमदार महादेवराव महाडिक यांना भाजपने दिलेला पाठिंबा हा कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा असेल, असा दावा आमदार हाळवणकर यांनी केला. त्यांनी पुढे सांगितले की, लोकशाहीत निवडणूक लढविणे हा प्रत्येक राजकीय पक्षाचा हक्क असतो. यामुळे आम्ही भाजपतर्फे नगरसेवक विजयराव सूर्यवंशी यांचा उमेदवारी अर्ज भरला होता; परंतु विजयापर्यंतचा टप्पा गाठण्याएवढी मते आमच्या पक्षाकडे नाहीत. त्यामुळे निवडणूक लढविण्यापेक्षा आपल्या विचारांच्या उमेदवारास पाठिंबा द्यावा, असा विचार पुढे आला. त्यानुसार शुक्रवारी मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष दानवे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि मी स्वत: नागपूर येथे एकत्र बैठक घेऊन आमदार महाडिक यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. आमदार महाडिक यांची उमेदवारी ही सर्वपक्षीय आहे. त्यांच्याशी असलेले आमचे राजकीय संबंध, त्यांचे पुत्र अमल महाडिक हे भाजपचे आमदार आहेत. त्यांचे दुसरे पुत्र स्वरूप महाडिक यांच्या ताराराणी आघाडीसोबत भाजपची महापालिकेत आघाडी आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही महाडिक यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. महाडिक यांनी आमच्याकडे येऊन पाठिंबा द्या, अशी मागणीही केली नव्हती. हा आमचा निर्णय आहे, असे हाळवणकर यांनी सांगितले. भाजपची मते साधारण ६५ ते ७० आहेत. त्याचबरोबर आमच्या शब्दावर काही मते मिळणार आहेत. साधारण १०० मते आम्ही महाडिक यांना मिळवून देऊ. कॉँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या भूमिका प्रत्येक निवडणुकीवेळी वेगवेगळ्या असतात. त्यामुळे त्यांना या निवडणुकीत अद्दल घडविणार असल्याचे हाळवणकर म्हणाले. यावेळी महानगरचे अध्यक्ष महेश जाधव, गोकुळ दूध संघाचे संचालक बाबा देसाई, मनपा गटनेते संभाजी जाधव, नगरसेवक विजयराव सूर्यवंशी, अजित ठाणेकर, आशिष ढवळे, राहुल चिकोडे, अ‍ॅड. संपतराव पवार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)