शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Politics: भाजप मते घेण्यात, तर राष्ट्रवादी 'जागात' भारी; पक्षनिहाय मतदान...जाणून घ्या

By राजाराम लोंढे | Updated: February 14, 2026 16:03 IST

दुसऱ्या क्रमांची मते घेऊनही राष्ट्रवादी ठरली अव्वल : कोरे, नरके, माने, शिवाजीराव पाटील यांना करावी लागणार नव्याने बांधणी

राजाराम लोंढेकोल्हापूर : जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ३ लाख ४२ हजार मते घेतली असली तरी जागा मात्र १२ मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाने ३ लाख ४१ हजार ३१ मते घेत सर्वाधिक २० जागा जिंकून जिल्ह्यावरील आपली पकड घट्ट केली आहे. या निवडणुकीत विधानसभा मतदारसंघनिहाय पक्षांच्या उमेदवारांना मिळालेली मते पाहता, विनय कोरे, चंद्रदीप नरके, अशोकराव माने, शिवाजीराव पाटील यांना मतदारसंघात आगामी चार वर्षांत नव्याने बांधणी करावी लागणार आहे.लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर सव्वा वर्षाने झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्या. त्यात या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तब्बल नऊ वर्षांनी होत असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी ताकदीने लढवल्या होत्या. जिल्हा परिषदेच्या ६८ जागांपैकी सर्वाधिक ४१ जागा भाजपने लढवल्या होत्या. महायुती व महाविकास आघाडीने सोयीनुसार आघाड्या केल्या असल्या तरी या निवडणुकीतून प्रत्येक पक्षाची ताकद समजली आहे.

भाजपची स्वबळाची तयारी...भाजपने जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक ४१ जागांवर उमेदवार दिले होते. त्यातही सर्वच्या सर्व बारा तालुक्यांत त्यांनी उमेदवार उभा करून पक्षाचे चिन्ह घरोघरी पोहचण्याचा प्रयत्न केला. आगामी लोकसभा व विधानसभेची तयारी म्हणून भाजपने या निवडणुकीकडे पाहिले आहे. यातून त्याची स्वबळाची तयारी दिसते; पण ‘करवीर’विधानसभा मतदारसंघात त्यांनी चार जिल्हा परिषदेच्या आणि ९ पंचायत समितीच्या जागा लढवल्या होत्या, येथे त्यांना यश आले नाही.

‘करवीर’, ’राधानगरी’ काँग्रेसने घेतली लक्ष्यवेधी मतेकाँग्रेसने ‘करवीर’, ‘राधानगरी’ व ‘हातकणंगले’ विधानसभा मतदारसंघात लक्ष्यवेधी मते घेतली. ‘करवीर’मध्ये ५९ हजार, ‘राधानगरी’मध्ये ७२ हजार ९२५ तर हातकणंगलेत ५८ हजार ८२८ मते घेतल्याने आगामी निवडणुकांच्या दृष्टीने त्यांचा आत्मविश्वास वाढवणारा निकाल ठरला आहे.

नरकेंच्या जागा कमी; पण मते अधिककरवीर विधानसभा मतदारसंघात आमदार चंद्रदीप नरके यांच्या जागा कमी झाल्या असल्या तरी शिंदेसेनेच्या उमेदवारांनी तब्बल ९१ हजार ८२९ मते घेतली आहेत. येथे भाजपने ऐन वेळी हात सोडूनही त्यांनी राष्ट्रवादी, भाजप, जनसुराज्य विरोधात एकाकी झुंज दिली. राष्ट्रवादीने ६९ हजार ४०४ तर भाजपने १९ हजार ७८६ व जनसुराज्य पक्षाने ३१ हजार मते घेतली.

अशी मिळालेली पक्षनिहाय मतदान...

पक्ष लढवलेल्या जागा विजयी जागामिळालेली मते
भाजप ४११२३ लाख ४२ हजार ९४०
राष्ट्रवादी ४० २० ३ लाख ४१ हजार ०३१
काँग्रेस ३८ १४ २ लाख ८४ हजार २०५
शिंदेसेना ३२ ०९ ३ लाख ९ हजार १२१
जनसुराज्य१२ ०५ १ लाख ५७ हजार ५७०
उद्धवसेना १३०१ ५५ हजार ८९८
स्वाभिमानी०५ ०१ ३४ हजार १४०
शाहू आघाडी (शिरोळ)०७ ०४ ५८ हजार १८
शिवशाहू (भुदरगड)०४०१ ४१ हजार ७९४
English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Politics: BJP Leads in Votes, NCP Wins More Seats

Web Summary : In Kolhapur local elections, BJP secured more votes but NCP won more seats. Key leaders must rebuild constituencies. Congress gained significantly in Karveer, Radhanagari, and Hatkanangale.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे