शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
3
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
4
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
5
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
6
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
7
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
8
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
9
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
10
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
11
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
12
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
13
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
14
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
15
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
16
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
17
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
18
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
19
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
20
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
Daily Top 2Weekly Top 5

भाजप आगामी निवडणुका स्वबळावर लढविणार, सुरेश हाळवणकर यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 12:52 IST

राज्यात मंत्रिमंडळ स्थापन होण्यापूर्वी स्थानिक पातळीमध्ये महायुतीत दुरावा

इचलकरंजी : जिल्ह्यातील महापालिका, जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणाशीही युती न करता स्वबळावर लढविण्याची घोषणा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी केली. त्यामुळे राज्यात मंत्रिमंडळ स्थापन होण्यापूर्वीच स्थानिक पातळीवर महायुतीमध्ये दुरावा निर्माण होत असल्याचे दिसत आहे.

भाजपचे नवनिर्वाचित आमदार राहुल आवाडे यांचा इचलकरंजी भाजप कार्यालयात सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

हाळवणकर म्हणाले, शहरातील तसेच जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांचे शटर बंद झाले आहे. फक्त ताराराणी पक्षाचे शटर सुरू आहे. त्यांनी ते बंद करून इकडे यावे. भाजपला मिळालेला विजय हा सांघिक आहे. जिल्ह्यामध्ये पक्ष मोठा व्हावा, यासाठी आवाडे यांना स्वीकारले. लोकसभेपेक्षा १८ हजारांचे अधिक मताधिक्य या निवडणुकीत मिळाले. २४ बूथमध्ये १८०० मतांनी आम्ही कमी आहोत, याचा कार्यकर्त्यांनी विचार करावा. जिल्ह्यातील महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याचा संदेश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. त्यानुसार कोणत्याही पक्षाशी युती न करता या निवडणुका लढविल्या जातील.

इचलकरंजी महापालिकेचे ६२ नगरसेवक निवडून आणण्याबरोबरच भाजपचा महापौर केला जाईल. कोणत्या भागात मते कमी पडली, याचा विचार केला जाईल. जे पक्षातून लांब गेले, कमळाला अपमानित केले, त्यांना स्थान दिले जाणार नाही. प्रकाश आवाडे व माझ्याशिवाय कोणताही निर्णय घेण्यात येणार नाही.

आमदार प्रकाश आवाडे म्हणाले, ताराराणी पक्ष भाजपमध्ये विसर्जित करता येतो का? याची प्रक्रिया काय आहे, याची माहिती घेतली जाईल. आगामी स्थानिक निवडणुकीत उमेदवारी देताना संबंधित भागात पडलेल्या मतांचे मोजमाप केले जाईल. आमदारकी हे मिरविण्याचे पद नाही, त्यामागे मोठी जबाबदारी आहे. राहुलला २४ तास काम करावे लागेल. तो ते करील, या विश्वासानेच त्याला उमेदवारी दिली होती.

राहुल आवाडे म्हणाले, सन २०१९ ला भाजपची सत्ता गेल्यानंतर काही संस्था आपल्या हातून निसटल्या आहेत. त्यामध्ये आपण लक्ष घालण्याची गरज आहे. शिरोळ व हातकणंगले तालुक्यांमध्ये १९ नगरपालिका व जि.प.चे काही मतदारसंघ आहेत. तेथेही ताकद देण्याची गरज आहे. अमृत भोसले यांनी स्वागत केले. यावेळी मिश्रीलाल जाजू, सतीश डाळ्या, महावीर गाठ, अहमद मुजावर, तानाजी पोवार, विकास चौगुले, शेखर शहा, आदी उपस्थित होते.

‘जवाहर’चे दार उघडा

हाळवणकर यांनी जवाहर साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल प्रकाश आवाडे यांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर ‘आम्ही पक्षात तुमच्यासाठी गेट उघडले आहे. तुम्ही कार्यकर्त्यांसाठी ‘जवाहर’चा दरवाजा उघडा’ अशी मिस्कील टिप्पणी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBJPभाजपाElectionनिवडणूक 2024Suresh Ganapati Halvankarसुरेश गणपती हाळवणकर