शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

सभापती पदासाठी भाजपा, सेना, काँग्रेस, स्वाभिमानी एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:22 IST

दत्ता बिडकर हातकणंगले : पंचायत समितीच्या सभापती निवडीसाठी २२ जानेवारीस दुपारी २ वाजता तहसीलदार डॉ. प्रदीप उबाळे यांच्या अध्यक्षतेखाली ...

दत्ता बिडकर

हातकणंगले : पंचायत समितीच्या सभापती निवडीसाठी २२ जानेवारीस दुपारी २ वाजता तहसीलदार डॉ. प्रदीप उबाळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन केले आहे.

सभापती पदासाठी नाटयमय घडामोडी सुरू असून भाजपाचे सहा, जनसुराज्यचे पाच, शिवसेना दोन, स्वाभिमानी दोन, काँग्रेस एक आणि अपक्ष एक अशा १७ सदस्यांनी एकत्र येऊन सभापती निवडण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाचे उत्तम सावंत ( नागाव ) आणि जनसुराज्यचे डॉ. प्रदीप पाटील (टोप) यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे.

हातकणंगले पंचायत समितीमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही. २०१७ च्या निवडणुकीमध्ये भाजपा - ६, जनसुराज्य - ५, आवाडे यांची ताराराणी आघाडी - ५, शिवसेना - २, स्वाभिमानी शेतकरी संघटना - २, काँग्रेस -१, आणि अपक्ष - १ अशी त्रिशंकू सभागृहाची स्थिती होती. पहिल्या सभापती पदासाठी भाजपा आणि जनसुराज्यचे ११ सदस्य एकत्र आले. काँग्रेसचा एकमेव सद्स्य गैरहजर राहिला. त्यावेळी भाजपाच्या रेश्मा सनदी (कबनूर) या सव्वा वर्षासाठी सभापती झाल्या. दुसऱ्यावेळी भाजपाने जनसुराज्यला साथ दिली आणि जनसुराज्यच्या सरितादेवी मोहिते (घुणकी) या सभापती झाल्या.

अडीच वर्षानंतर सभापती पदाचे आरक्षण सर्वसाधारण झाले. आवाडे यांच्या ताराराणी आघाडीने आपले- ५, शिवसेना - २, स्वाभिमानी - २, काँग्रेस - १ अपक्ष - १ आणि भाजपचा एक सदस्य फोडून आवाडे गटाचे महेश पाटील (चंदूर) सभापती झाले, तर काँग्रेसचे एकमेव सदस्य राजू भोसले ( नरंदे ) उपसभापती झाले. आवाडे गटाचे महेश पाटील यांनी मुदतीत राजीनामा दिला नाही, म्हणून त्यांच्याविरुद्ध सर्व सद्स्य एकत्र आले आणि अविश्वास ठराव दाखल केला. आता राजकीय घडामोडी सुरू झाल्या.

सभापती पदासाठी पुन्हा एखादा एकमेकाविरुद्ध आवाज उठवणारे, सभागृहामध्ये लढणारे एकत्र आल्याचे चित्र असून जिल्ह्याच्या राजकारणापलीकडचे राजकारण सुरू आहे. भाजपा, जनसुराज्य, शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमानी आणि अपक्ष असे १७ सदस्य एकत्र आले असून २२ जानेवारी रोजी भाजपा आणि जनसुराज्यचा सभापती करण्यासाठी नेतेमंडळी सरसावली आहेत.

ताराराणी आघाडीला वगळणार

प्रकाश आवाडे गटाच्या ताराराणी आघाडीचे ५ सदस्य वगळून भाजपा, जनसुराज्य, शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अपक्ष असे १७ सदस्य एकत्र आल्याने तालुक्याच्या राजकारणामध्ये भूकंप होण्याची शक्यता आहे.