शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

भोगावती नदीचे पाणी पात्राबाहेर

By admin | Updated: July 13, 2014 00:42 IST

कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पाऊस : ‘पंचगंगे’ची पातळीही वाढली

कोल्हापूर : गेले दोन दिवस जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. भोगावती नदीचे पाणी यावर्षी पहिल्यांदाच पात्राबाहेर पडले असून, पंचगंगेची पातळीही वाढली आहे. धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यात आज, शनिवारी पावसाचा जोर थोडा वाढला. गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, पन्हाळा, शाहूवाडी, चंदगड, आजरा तालुक्यांत दमदार पाऊस सुरू होता. कोल्हापूर शहर, हातकणंगले, शिरोळ व करवीर तालुक्यांत पावसाचा जोर कमी असला, तरी दिवसभर रिपरिप सुरू होती. भोगावती, कुंभी, कासारी, तुळशी, पंचगंगा या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, भोगावती नदीचे पाणी पहिल्यांदाच पात्राबाहेर पडले आहे. पंचगंगा पात्रातील मंदिरे पाण्याखाली जाऊ लागली आहेत. पाण्याची पातळी १३ फुटांपर्यंत वाढली आहे. आज सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी २४.६४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गगनबावडा, भुदरगड व शाहूवाडी तालुक्यांत जोरदार पाऊस असल्याने रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. रस्ता खराब झाल्याने या तिन्ही तालुक्यांतील सात मार्गावरील वाहतूक अंशत: बंद झाली आहे. (प्रतिनिधी)