भादोले गावाला विकासनिधी कमी पडू देणार नाही -आ. आवळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:01 IST2021-02-05T07:01:02+5:302021-02-05T07:01:02+5:30

भादोले येथे आमदार फंडातून गाव कमान ते भद्रेश्वर मंदिर तसेच रिक्षा स्टँड ते गाव तलाव या दोन रस्त्यांच्या ...

Bhadole village will not be allowed to run out of development funds. Awale | भादोले गावाला विकासनिधी कमी पडू देणार नाही -आ. आवळे

भादोले गावाला विकासनिधी कमी पडू देणार नाही -आ. आवळे

भादोले येथे आमदार फंडातून गाव कमान ते भद्रेश्वर मंदिर तसेच रिक्षा स्टँड ते गाव तलाव या दोन रस्त्यांच्या उद्घाटन व मसोबावाडी येथे हायमास्ट दिव्याचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ग्रामविकास पॅनलचे नेते धोंडिराम पाटील होते.

आवळे म्हणाले, भादोले गावचा विस्तार वाढत आहे गावची लोकसंख्याही वाढत आहे. या गावच्या विकासकामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही आ. आवळे यांनी यावेळी दिली.

यावेळी सरपंच आनंदराव कोळी, ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील, उपसरपंच अजमुंबी सनदे, कपिल पाटील, विजय पाटील, दिलीप पाटील, सचिन नांगरे, आनंदराव यादव, चद्रकांत पाटील, दीपक पाटील, शहाजी घोलप, आनंदराव सुतार, गुलाबराव यादव, संपतराव पाटील, विक्रम माने, ग्रामसेवक एस.डी. मुसळे उपस्थित होते.

भादोले- येथे आ. राजू आवळे यांच्या फंडातून रस्त्याच्या कामाचे उद्घाटन करताना आ. राजू आवळे, धोंडिराम पाटील, सरपंच आनंदराव कोळी आदी उपस्थित होते.

Web Title: Bhadole village will not be allowed to run out of development funds. Awale