गवंडीकामाच्या पैशातून कामगारास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 16:55 IST2020-02-17T16:53:22+5:302020-02-17T16:55:15+5:30

गणेशनगर-शिंगणापूर (ता. करवीर) येथे गवंडीकामाच्या पैशाच्या हिशोबातून कामगारास तिघांनी बेदम मारहाण केली. जमीर सत्तार बोकर (वय ३४) असे जखमीचे नाव आहे. करवीर पोलिसांनी संशयित सागर कोरे, नीलेश कापूसकर, ब्रॅन्डी (पूर्ण नाव नाही) यांच्यावर गुन्हा दाखल केला. १६ फेब्रुवारीला हा प्रकार घडला.

Beating a worker with cash | गवंडीकामाच्या पैशातून कामगारास मारहाण

गवंडीकामाच्या पैशातून कामगारास मारहाण

ठळक मुद्देगवंडीकामाच्या पैशातून कामगारास मारहाणतिघांवर गुन्हा : गणेशनगर-शिंगणापूर येथील घटना

कोल्हापूर : गणेशनगर-शिंगणापूर (ता. करवीर) येथे गवंडीकामाच्या पैशाच्या हिशोबातून कामगारास तिघांनी बेदम मारहाण केली. जमीर सत्तार बोकर (वय ३४) असे जखमीचे नाव आहे. करवीर पोलिसांनी संशयित सागर कोरे, नीलेश कापूसकर, ब्रॅन्डी (पूर्ण नाव नाही) यांच्यावर गुन्हा दाखल केला. १६ फेब्रुवारीला हा प्रकार घडला.

पोलिसांनी सांगितले, जमीर बोरकर हा गवंडी काम करतो. त्याचा व सागर कोरे याचा गवंडी कामाच्या पैशातून वाद आहे. १६ फेब्रुवारीला जमीर गणेशनगर येथे राहत असलेल्या नरेंद्र गागडे यांच्या घराजवळ गेला असता संशयितांनी त्याला बोलावून घेतले.

पैशाचे काय झाले, अशी विचारणा करून लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण केली. सहाय्यक निरीक्षक अरविंद कांबळे तपास करीत आहेत.
 

 

Web Title: Beating a worker with cash