वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:27 IST2021-03-23T04:27:00+5:302021-03-23T04:27:00+5:30

इचलकरंजी : येथील आवळे गल्ली परिसरामध्ये थकीत वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्यास पाच ते सहा अनोळखी व्यक्तींनी लाथा-बुक्क्यांनी ...

Beating an employee who went to collect electricity bill | वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यास मारहाण

वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यास मारहाण

इचलकरंजी : येथील आवळे गल्ली परिसरामध्ये थकीत वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्यास पाच ते सहा अनोळखी व्यक्तींनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. युवराज माळी असे त्यांचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी घडली. दरम्यान, या प्रकरणात मध्यस्थांमार्फत तडजोड करून वादावर पडदा टाकण्यात आला. त्यामुळे याबाबत पोलिसांत नोंद झाली नाही.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, युवराज माळी हे नेहमीप्रमाणे महावितरणचे थकीत वीज बिल असणाऱ्या ग्राहकांकडे वसुलीसाठी गेले होते. आवळे गल्ली परिसरात एका ग्राहकाकडे त्यांनी थकीत वीज बिलाची मागणी केली असता, परिसरातील पाच ते सहा अनोळखी व्यक्तींनी त्यांना शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे त्यांना आयजीएम रुग्णालयात दाखल केले. ही बातमी महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना समजताच त्यांनी थेट गावभाग पोलीस ठाणे गाठले. तेथे मोठी गर्दी जमली होती. अखेर काही मध्यस्थांनी तडजोड करून तक्रार न देता प्रकरण मिटविले.

फोटो ओळी

२२०३२०२१-आयसीएच-०४

इचलकरंजीत महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण झाल्यानंतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी गावभाग पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली होती.

Web Title: Beating an employee who went to collect electricity bill