शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
2
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
3
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
5
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
6
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
7
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
8
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
9
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
10
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
11
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
12
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
13
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
14
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
15
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
16
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
17
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
18
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
19
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
20
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
Daily Top 2Weekly Top 5

संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यास सज्ज रहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:25 IST

कोल्हापूर : कोरोनाबरोबर संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने सज्ज राहावे, असे आवाहन आमदार चंद्रकांत जाधव यांनी केले. संभाव्य ...

कोल्हापूर : कोरोनाबरोबर संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने सज्ज राहावे, असे आवाहन आमदार चंद्रकांत जाधव यांनी केले.

संभाव्य पूरपरिस्थितीच्या नियोजनासाठी आयोजित दक्षता बैठकीत ते बोलत होते. महानगरपालिकेच्या निवडणूक कार्यालयात ही बैठक झाली. यावेळी महानगरपालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे उपस्थित होत्या.

कोरोनाबरोबर संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहणे गरजेचे आहे. पूर्वनियोजन असेल तरच कोरोना व संभाव्य पूरस्थिती अशा दोन आपत्तींच्या आघाडीवर लढताना प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा व नागरिकांची तारांबळ टाळता येणे शक्य असल्याचे आमदार जाधव म्हणाले.

कळंबा तलाव भरला तर ओढयातील पाण्याला फुग येऊन जरगनगर, रामानंद नगर भागातील काही घरात पाणी जाते, हे टाळण्यासाठी शहरातील सर्व ओढे व नाल्यांची साफसफाई करून घ्यावी. ज्या छोट्या नाल्यात जेसीबी जात नाहीत तेथे छोटे जेसीबी किंवा कर्मचाऱ्यामार्फत स्वच्छता करून घ्यावी. धोकादायक झाडे, फांद्या पावसाळ्यापूर्वी तोडावीत. जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी धोकादायक इमारतीची पाहणी करून, नागरिकांना सूचना द्याव्यात, अशा सूचना आमदार जाधव यांनी दिल्या.

बालिंगा पंपिंग स्टेशन उंचावर घेण्यात येत आहे. त्याठिकाणी सबमर्सिबल व व्हर्टिकल पंप बसविण्यात आले आहेत. त्यामुळे पूरपरिस्थितीमध्येही शहराचा पाणीपुरवठा सुरळीत राहणार असल्याचे प्रशासक डॉ. बलकवडे यांनी सांगितले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, प्रभारी शहर अभियंता नारायण भोसले, उपशहर अभियंता एन. एस. पाटील, हर्षजीत घाटगे, बाबूराव दबडे, जल अभियंता एन. एस. साळोखे, आपत्ती व्यवस्थापक रणजित चिले, ड्रेनेज चॅनेल सफाई स्वप्नील उलपे, समीर व्याघ्रंबरे, आदी उपस्थित होते.

फाेटो क्रमांक - १२०५२०२१-कोल-केएमसी मिटींग

ओळ - कोल्हापूर शहरातील संभाव्य पूरपरिस्थितीसंदर्भात आमदार चंद्रकांत जाधव व प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या उपस्थितीत बुधवारी बैठक झाली. यावेळी महापालिकेचे सर्व अधिकारी उपस्थित होते.