शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

नात्यागोत्यांची अन् घराणेशाहीची लढाई

By admin | Updated: October 19, 2015 00:26 IST

तीन माजी महापौरांनीही ठोकला शड्डू : १३ विद्यमान, २४ माजी नगरसेवक रिंगणात

तानाजी पोवार --- कोल्हापूर--महापालिका निवडणुकीसाठी अनेक काट्यांच्या लढती असल्या तरी नात्यागोत्यांतील लढतीही मोठ्या प्रमाणावर आहेत. नगरसेवकांसह माजी नगरसेवकांतील लढती; तसेच सख्खा भाऊ, सख्ख्या जाऊबाई यांच्या लढतीही लक्षवेधी आहेत. १३ विद्यमान, २४ माजी नगरसेवक थेट रिंंगणात आहेत; तर आजी-माजी नगरसेवकांचे २० पती-पत्नी लढतीसाठी सज्ज आहेत. जयश्री सोनवणे, उदय साळोखे, नंदकुमार वळंजू या तीन माजी महापौरांनीही पुन्हा रिंगणात शड्डू ठोकला आहे. रिंगणात एकूण ५०६ उमेदवार लढतीसाठी सज्ज आहेत. २४ माजी नगरसेवक आणि आजी-माजी नगरसेविकांचे २१ पती-पत्नी रिंगणात आहेत. खोलखंडोबा, कैलासगडची स्वारी, संभाजीनगर बसस्थानक या प्रभागांत विद्यमान नगरसेवकांतील थेट लढती लक्षवेधी ठरणार आहेत.आजी-माजी नगरसेवकांचे पती, पत्नी, मुले, सुना रिंगणात माजी महापौर वंदना बुचडे यांचे पती सुभाष बुचडे, नगरसेविका पल्लवी देसाई यांचे पती नीलेश देसाई. माजी नगरसेवक तुकाराम तेरदाळकर यांच्या पत्नी सुनंदा तेरदाळकर, माजी नगरसेविका मीनाक्षी काटकर यांचे पती एकनाथ काटकर, माजी महापौर कादंबरी कवाळे यांचे पती संदीप कवाळे, माजी नगरसेविका शुभांगी कोळेकर यांचे पती अनिल कोळेकर, नगरसेविका वंदना आयरेकर यांचे पती विश्वास आयरेकर, नगरसेविका मीना सूर्यवंशी यांचे पती नंदकुमार सूर्यवंशी, नगरसेवक प्रकाश कुंभार यांच्या पत्नी वर्षा कुंभार, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे यांच्या पत्नी सरिता मोरे, नगरसेवक प्रकाश पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील, आदिल फरास यांच्या आई हसीना फरास, नगरसेवक रमेश पोवार यांच्या पत्नी संगीता पोवार, माजी नगरसेवक (कै.) दिलीप डोईफोडे यांच्या पत्नी दीपाली डोईफोडे, माजी नगरसेवक अनिल कदम यांच्या पत्नी अश्विनी कदम, नगरसेवक शिवाजी डोंगळे यांच्या पत्नी शोभा डोंगळे, नगरसेवक सचिन खेडकर यांच्या पत्नी अनुराधा, नगरसेवक सुभाष रामुगडे यांच्या पत्नी शीतले, माजी महापौर (कै.) दिलीप मगदूम यांच्या पत्नी दीपा मगदूम, माजी नगरसेवक किरण दरवान यांच्या पत्नी स्मिता, माजी नगरसेवक भरत लोखंडे यांच्या पत्नी माधुरी यांच्यासह नगरसेवक आप्पा बेडगकर यांचा मुलगा चंद्रशेखर, नगरसेवक आर. डी. पाटील यांची कन्या श्रुती पाटील, माजी नगरसेविका रेखाताई सुरेश पाटील यांचा मुलगा संदीप. नगरसेवक प्रकाश नाईकनवरे यांच्या स्नुषा पूजा, माजी उपमहापौर प्रार्थना समर्थ यांच्या स्नुषा वैष्णवी समर्थ.एकाच घरात दोन उमेदवारशिवाजी पार्क प्रभागातून नगरसेवक राजेंद्र लाटकर, तर त्यांची पत्नी सूरमंजिरी लाटकर यांना शाहू कॉलेज प्रभागातून राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. व्हीनस कॉर्नरमधून नगरसेवक प्रकाश नाईकनवरे यांना, तर त्यांच्या स्नुषा पूजा स्वप्निल नाईकनवरे यांनाही शाहूपुरी उत्तरमधून भाजप-ताराराणी महायुतीकडून उमेदवारी दिली आहे.फिरंगाईमधून भाजप-ताराराणीकडून तेजस्विनी रविकिरण इंगवले यांना त्यांच्या जाऊबाई प्रज्ञा अजय इंगवले यांनी अपक्ष म्हणून आव्हान उभे केले आहे.तटाकडील तालीम प्रभागातून माजी महापौर उदय साळोखे (शिवसेना) व त्यांचे ज्येष्ठ बंधू चंद्रकांत साळोखे (अपक्ष) हे एकमेकांविरोधात रिंगणात आहेत.‘संभाजीनगर बसस्थानक’मधून महायुतीकडून यशोदा मोहिते, तर ‘नाथा गोळे तालीम’मधून त्यांचे पती प्रकाश मोहिते महायुतीकडून उतरले आहेत.नगरसेवकांतील थेट लढतीप्रभाग क्र. ३० : खोलखंडोबा : श्रीकांत बनछोडे (काँग्रेस) विरुद्ध किरण शिराळे (भाजप-ताराराणी) या नगरसेवकांत थेट लढत. प्रभाग क्र. ४५ : कैलासगडची स्वारी : संभाजी देवणे (राष्ट्रवादी) विरुद्ध संभाजी जाधव (भाजप-ताराराणी)प्रभाग क्र. ५६ : संभाजीनगर बसस्थानक : यशोदा मोहिते (भाजप-ताराराणी) विरुद्ध महेश सावंत (राष्ट्रवादी).माजी नगरसेवक रिंगणातसुभाष बुचडे, अशोक जाधव, नीलेश देसाई, प्रदीप पोवार, दिलीप पोवार, सुनील मोदी, मधुकर काकडे, सरिता नंदकुमार मोरे, सुवर्णा विश्वनाथ सांगावकर, विलास वास्कर, पद्मावती पाटील, आशिष ढवळे, विजय सूर्यवंशी, सुजय पोतदार, विक्रम जरग, प्रकाश मोहिते, पांडुरंग आडसुळे, हरिदास सोनवणे, रवींद्र आवळे, उषा जाधव, अशोक भंडारे.