शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
2
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
3
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
4
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
5
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
6
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
7
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
8
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
9
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
10
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
11
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
12
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
13
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
14
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
15
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
16
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
17
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
18
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
19
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
20
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

वटवाघळांवर काळरात्र--वळवाने उडवली दैना जिल्ह्यात साडेबारा लाखांचे नुकसान

By admin | Updated: May 7, 2015 00:38 IST

पर्यावरणप्रेमी सरसावले : ९३ वटवाघळांचा मृत्यू; शेकडोंना जीवदान

कोल्हापूर : वादळी पावसामुळे टाउन हॉल येथील पिंपळाच्या झाडाची फांदी मंगळवारी रात्री तुटून जमिनीवर पडली. त्यामुळे या फांदीवर विसावलेल्या ९३ वटवाघळांचा जमिनीवर आपटून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी उद्यानात फिरायला आलेल्या पर्यावरणप्रेमी व सजग नागरिकांना समजली. त्यांनी तत्काळ पडलेल्या एकेक वटवाघळाला परत झाडावर उडविण्याचा प्रयत्न केला. यात काही वटवाघळे पुन्हा झाडावर विसावली, तर ९३ वटवाघळांचा खाली पडून मृत्यू झाल्याचे दिसून आले. बुधवारी सकाळी टाऊन हॉल बागेत वटवाघळे मृत झाल्याची माहिती समजताच नागरिकांनी तत्काळ वन विभाग व अग्निशमन दलाला ही बाब कळविली. मात्र, नेहमीप्रमाणे वन विभागाचे कर्मचारी वेळाने आले, तर अग्निशमन दलाने तत्काळ धाव घेतली. वटवाघळे सस्तन, निशाचार पक्षी असल्याने त्यांना फक्त रात्रीचे दिसते. त्यामुळे ती तशीच जमिनीवर पडून होती. फिरायला आलेल्या पर्यावरणप्रेमी व अग्निशमन दलाच्या जवानांनी दोनशेहून अधिक वटवाघळांना जवळील छोट्या झाडावर सुखरूप नेऊन सोडले; तर अन्य ९३ मृत वटवाघळांना अग्निशमन दल व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पशुवैद्यकीय रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठविले. यावेळी पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड, करवीरचे वनपाल पी. डी. घोडके, आर. के. देसा यांनी येऊन पाहणी केली; तर वाठार येथील राजू कांबळे हे करवीरचे तहसीलदार कार्यालयात कामानिमित्त आले होते. त्यांनीही अनेक वटवाघळांना सुखरूप दुसऱ्या झाडावर चढविले. दरम्यान, सस्तन पक्षी असलेल्या वटवाघळाचे रक्त गरम असल्याने याचा वापर औषध म्हणून अर्धांगवायू व संधिवातावर केला जातो, या गैरसमजापोटी अनेक वटवाघळे मृत झाल्याचे समजल्यानंतर अनेकजण टाउन हॉल उद्यानात पोती घेऊन आले होते. मृत पडलेल्या वटवाघळांना उचलून पोत्यात घालण्याच्या तयारीत असलेल्या या नागरिकांना पर्यावरणप्रेमी व उद्यान कर्मचारी, वन, अग्निशमन दलाचे जवान यांनी हटकण्याचा प्रयत्न केला. यावेळी कर्मचारी व या नागरिकांत वादावादी झाली. कर्मचाऱ्यांनी या नागरिकांना पिटाळून लावले. मन पिळवटून टाकणारे दृश्यजमिनीवर आपटल्याने अनेक वटवाघळांचा मृत्यू झाला. यावेळी वटवाघळाच्या पाच माद्या आपल्या पिलांना पंखांखाली घेऊन पडल्याचे दिसून आले. यात मादी पक्ष्यांचा मृत्यू झाला होता. मात्र, पंखांखाली असलेली पाच पिल्ले आईचे दूध पिताना जिवंत दिसून आली. त्यांनाही वाचविण्यात यश आले. १०२ खांब भुईसपाटवीज कंपनीला ‘शॉक’ : कर्मचाऱ्यांनी रात्रभर केले कामअग्निशमन दलाची तारांबळशेकडो फोन : झाडे कोसळण्याची शहरात मालिकाचशहरात पाणीपुरवठा ठप्प; टँकरने पुरवठाबाजार समितीत चिखलातच झाले कांदा सौदे