शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘सीटीएस’ प्रणालीत बॅँकांनी सहभागी व्हावे

By admin | Updated: August 24, 2014 00:54 IST

प्रमोद कर्नाड यांचे सहकारी बॅँकांना आवाहन : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेत सहकारी बॅँकांच्या प्रतिनिधींची बैठक

कोल्हापूर : रिझर्व्ह बॅँकेच्या धोरणानुसार राज्य बॅँकेने कोल्हापूर शाखेत ‘सीटीएस’ प्रणाली सुरू केली असून, त्यामध्ये जिल्ह्यातील नागरी सहकारी बॅँकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य सहकारी बॅँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड यांनी केले.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत राज्य बॅँकेच्या वतीने जिल्ह्यातील सहकारी बॅँकांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये ते बोलत होते. एप्रिल २०१४ पासून रिझर्व्ह बॅँकेने जिल्हा बॅँकेसह सर्वच नागरी सहकारी बॅँकांना ‘सीटीएस’ची सक्ती केली आहे. धनादेश वटविण्यासाठी तो संबंधित बॅँकेकडे पाठवावा लागत होता. या प्रक्रियेला बराच विलंब लागत असल्याने ग्राहकांची अडचण होते. याउलट राष्ट्रीयीकृत बॅँका फारच पुढे गेल्या आहेत. यासाठी रिझर्व्ह बॅँकेने राज्य बॅँक, जिल्हा बॅँकांसह नागरी सहकारी बॅँकांना ‘सीटीएस’ची सक्ती केली आहे. त्यानुसार राज्य बॅँकेने कोल्हापूर शाखेत ही सुविधा सुरू केली असून, त्यामध्ये जिल्ह्यातील बॅँकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रमोद कर्नाड यांनी केले. जिल्ह्यातील काही बॅँकांनी ही सुविधा अगोदरच दुसऱ्या यंत्रणेकडून घेतली आहे. त्यांनी आता काय करायचे अशी विचारणा बॅँकांच्या प्रतिनिधींनी केली. बॅँकेकडून नाममात्र फी घेतली जाणार आहे. येत्या दोन दिवसांत ही सुविधा बॅँकांना उपलब्ध करून दिली जाणार असून, जिल्ह्यातील बॅँकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे कर्नाड यांनी सांगितले. जिल्हा बॅँकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण, राज्य बॅँकेचे व्यवस्थापक सुधीर केदार, जिल्हा बॅँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने, यशवंत बॅँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश देसाई यांच्यासह बॅँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. राज्य बॅँकेचे शाखा सहव्यवस्थापक राजेंद्र बकाल यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)‘सीटीएस’ सुविधा मोफत कराराज्य बॅँकेने पालकत्वाच्या नात्याने नागरी बॅँकांना ‘सीटीएस’ सुविधा मोफत द्यावी, अशी मागणी बॅँक प्रतिनिधींनी केली. यावर नाममात्र फी आकारली आहे. व्यवसाय किती होतो, हे पाहून पुढील निर्णय घेतला जाईल, असे प्रमोद कर्नाड यांनी सांगितले. ‘सीआरएआर’ची अटही सुविधा उपलब्ध होण्यासाठी संबंधित बॅँकेच्या चालू खात्यावरील रकमेबाबत अट घालण्यात आली आहे. बॅँकेच्या ‘सीआरएआर’च्या २५ टक्के रक्कम चालू खात्यावर असणे बंधनकारक आहे. कशी असणार फी...४बॅँकेत येणाऱ्या चेकसाठी एक रुपया४जाणाऱ्या चेकसाठी पन्नास पैसे