शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

Leopard in Kolhapur: मृत्यूच्या दाढेतून बचावलो; बिबट्याचे दात दंडात आरपार गेले, गंभीर जखमीची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 17:37 IST

चोवीस तास उलटून गेले तरी वनविभाग अनभिज्ञ

आदित्य वेल्हाळ कोल्हापूर : येथील ताराबाई पार्कात बाळू अंबाजी हुंबे (रा. मूळ गगनबावडा, सध्या रा. भोसलेवाडी, कोल्हापूर) यांच्यावर मंगळवारी बिबट्याने हल्ला केला. दंडाचा जोरात चावा घेतला. यामध्ये ते जखमी झाले आहेत. त्यांना कसबा बावड्यातील सेवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मात्र, घटना घडून चोवीस तास उलटून गेले तरी याची माहिती वनविभागास नाही. हुंबे यांनीच ही माहिती दिली. हातावर पोट असणाऱ्या हुंबे यांच्या हाताचा चावा घेतल्याने त्यांच्या भाकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे.हुंबे यांचे वय ६५ वर्षे. ते कुटुंबासह भोसलेवाडी येथे राहतात. हुंबे दिवसभर फिरून बागकाम करतात. मंगळवारीही ते ताराबाई पार्कातील हॉटेलनजीकच्या घरातील बागकाम करीत होते. त्यावेळी अचानक बिबट्या आला. उंच भिंतीवरून उडी मारून आल्याने त्यांना काहीही कळण्याआधीच उजव्या हाताच्या दंडाचा जोरात चावा होता. बिबट्याने जोरदार चावा घेतल्याने त्याचे दात दंडाच्या आरपार गेल्याने ते घायाळ झाले. त्यांना तातडीने ‘सीपीआर’मध्ये उपचारासाठी दाखल केले. तेथे उपचार करून त्यांना सेवा रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या जखमी झालेल्या हाताची पूर्णपणे हालचाल बंद झाली आहे. परिणामी ते कुटुंब चिंताग्रस्त बनले आहेत. पत्नी भांडीकुंडी करते, तर हुंबे हे बागकाम करून चरितार्थ करतात. हुंबे यांच्या हाताची हालचालच थांबल्याने त्यांच्यासमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे.बिबट्याने हल्ला केल्यानंतर उपचाराचे पैसे मिळतात. वनविभागाकडून भरपाई मिळते, याचीही माहितीही त्यांना नाही. घटना घडून चोवीस तास झाले तरी वनविभागाचे अधिकारी भेटलेले नाहीत, कोणी मला पाहण्यासाठीही आलेले नाही, असे ते हताश होऊन सांगतात.

युद्धाचाच प्रसंगबिबट्याने हल्ला कसा केला व मी कसा बचावलो, याची माहिती ते युद्धाच्या प्रसंगाप्रमाणे हुंबे सांगत होते. ते म्हणाले, मृत्यूच्या दाढेतून बचावलो. बिबट्याचा चावा इतका जोरात होता. माझे कुटुंब आता उघड्यावर आले आहे. मला तातडीने वनविभागाने मदत करावी, अशी मागणी हुंबे यांनी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard attack in Kolhapur: Man injured, seeks immediate help.

Web Summary : A leopard attacked Balu Humbe in Kolhapur, severely injuring his arm. The 65-year-old gardener is now struggling, unable to work. He needs immediate help from the forest department for medical expenses and support as his livelihood is threatened.