शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

बालिंगे-बोंद्रेनगर रस्त्याचा अखेर पांग फिटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : बालिंगे ते बोंद्रेनगर रस्त्याचा अखेर वीस वर्षानंतर पांग फिटला. मोठमोठे खड्डे आणि पाण्यामुळे रोज ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : बालिंगे ते बोंद्रेनगर रस्त्याचा अखेर वीस वर्षानंतर पांग फिटला. मोठमोठे खड्डे आणि पाण्यामुळे रोज तीन-चार अपघात व्हायचे. मात्र ग्रामपंचायतीने ड्रेनेजसह रस्त्याचे मजबुतीकरण केल्याने परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

फुलेवाडी, जिल्हा परिषद कॉलनी, साने गुरुजी कॉलनीसह त्या भागात जाण्यासाठी जवळचा रस्ता असल्याने बालिंगे ते बोंद्रेनगर रस्त्याचा वापर केला जातो. स्वर्गीय दिग्विजय खानविलकर यांच्या निधीतून २००० साली तत्कालीन पंचायत समिती सदस्य मधुकर जांभळे यांनी या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण केले होते. अलीकडे या रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढल्याने रस्त्यांवर खड्डे आणि दलदलीचे साम्राज्य पसरले होते. ड्रेनेज लाईन नसल्याने परिसरातील कॉलन्यांचे पाणी थेट रस्त्यात येत असल्याने वाहने चालविताना जीव मुठीत घेऊनच चालवावी लागतात. बालिंगेचे सरपंच मयूर जांभळे, उपसरपंच पंकज कांबळे व सदस्यांनी नवीन ड्रेनेज लाईन टाकून रस्ता मजबुतीकरण केल्याने वीस वर्षांनंतर रस्त्याचा पांग फिटल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

कोट-

अनेक वर्षे व्यथा मांडूनही कोणी लक्ष देत नव्हते. मात्र सरपंच मयूर जांभळे व सदस्यांनी रस्त्याचे काम केल्याने आमची सोय झाली आहे.

- अविनाश लाड (नागरिक, महालक्ष्मी कॉलनी)

फुलेवाडीसह परिसरातील कॉलन्यांसाठी जवळच्या असणाऱ्या रस्त्याची खूपच दुर्दशा झाली होती. आता ड्रेनेजसह मजबुतीकरण केले. भविष्यात डांबरीकरणासाठी प्रयत्न करू.

- मयूर जांभळे (सरपंच, बालिंगे)

फोटो ओळी : कोल्हापुरातील बालिंगे ते बोंद्रेनगर रस्त्याचे तब्बल २० वर्षांनंतर मजबुतीकरण करण्यात आले. (फाेटो-२३०५२०२१-कोल- बोंद्रेनगर)