बालाजी पतसंस्थेला १ कोटी ८१ लाख रुपये नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:25 IST2021-04-04T04:25:07+5:302021-04-04T04:25:07+5:30

सर्वसामान्यांची सावकारी पाशातून सुटका करण्यासाठी १९९२ मध्ये सुरू झालेल्या बालाजी पतसंस्थेने गेल्या आर्थिक वर्षातील बदलांचे स्वागत करत चोख कामगिरी ...

Balaji Patsanstha makes a profit of Rs 1 crore 81 lakh | बालाजी पतसंस्थेला १ कोटी ८१ लाख रुपये नफा

बालाजी पतसंस्थेला १ कोटी ८१ लाख रुपये नफा

सर्वसामान्यांची सावकारी पाशातून सुटका करण्यासाठी १९९२ मध्ये सुरू झालेल्या बालाजी पतसंस्थेने गेल्या आर्थिक वर्षातील बदलांचे स्वागत करत चोख कामगिरी बजावली आहे. वस्त्रोद्योगातील अडचणी, मंदी यासह विविध कारणांनी संस्था चालवताना दमछाक झाली. तरीही अतिशय प्रतिकूल परिस्थितीत संस्था उत्तम प्रगती साधत एनपीए शून्य टक्के राखण्यात यशस्वी झाली आहे. संस्थेत सध्या ८६ कोटी ३५ लाख रुपयांच्या ठेवी असून ७० कोटी ३८ लाख रुपये कर्ज वाटप केले आहे. ४ कोटी ८८ लाख भागभांडवल असून १२ कोटी ३० लाख रुपये स्वनिधी आहे. ३८ कोटी ५९ लाख सुरक्षित गुंतवणूक केली आहे. संस्था प्रधान कार्यालयासह ७ शाखांतून उत्तम पद्धतीने कामकाज सुरू आहे. संस्थेचे स्वत:चे डाटा सेंटर असून, ग्राहकांना आरटीजीएस, एनईएफटी, एसएमएस बँकिंगच्या सेवा मोफत दिल्या जातात. आगामी वर्षात १०० कोटी रुपये ठेवीचे उद्दिष्ट आहे. यावेळी उपाध्यक्ष विनायक जोशी, कल्लेश्‍वर वाघमोडे, भगवान कांबुरे, शिरीष कांबळे, कादर तहसीलदार, शिवाजी कारंडे, जनरल मॅनेजर दिनेश रेंदाळकर, भारत गिड्डे यांच्यासह संचालक उपस्थित होते.

Web Title: Balaji Patsanstha makes a profit of Rs 1 crore 81 lakh