तेरसवाडी सरपंचपदी बबन कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:43 IST2021-03-04T04:43:10+5:302021-03-04T04:43:10+5:30

म्हालसवडे : तेरसवाडी ( ता. करवीर ) येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बबन भिकाजी कदम यांची व उपसरपंचपदी महादेव ...

Baban Kadam as Teraswadi Sarpanch | तेरसवाडी सरपंचपदी बबन कदम

तेरसवाडी सरपंचपदी बबन कदम

म्हालसवडे : तेरसवाडी ( ता. करवीर ) येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बबन भिकाजी कदम यांची व उपसरपंचपदी महादेव आनंदा सुतार यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हणमंत खाडे यांनी काम पाहिले.

तेरसवाडी, कदमवाडी, भोगमवाडी व मल्लेवाडी या चार गावांची ग्रुप ग्रामपंचायत असून, येथील सात जागांपैकी पाच सदस्य बिनविरोध निवडून आले होते.

उद्योगपती रामचंद्र भोगम, तानाजी भोगम, रघुनाथ भोगम व बळवंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध निवडी झाल्या. कळंबा येथील सरपंच सागर भोगम यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रंजना जाधव, सुनीता जगताप, भिकाजी कदम, सागर ढेरे उपस्थित होते. आभार ग्रामसेवक एस. जी. गुरव यांनी मानले.

०२ बबन कदम

Web Title: Baban Kadam as Teraswadi Sarpanch