सतीश चव्हाण यांना पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:50 IST2020-12-05T04:50:28+5:302020-12-05T04:50:28+5:30

म्हासुर्ली : म्हासुर्ली (ता. राधानगरी) येथील केंद्रशाळेचे शिक्षक सतीश संभाजी चव्हाण यांना क्रांतिसूर्य फाउंडेशन कोल्हापूर यांच्यावतीने राज्यस्तरीय आदर्श ...

Award to Satish Chavan | सतीश चव्हाण यांना पुरस्कार

सतीश चव्हाण यांना पुरस्कार

म्हासुर्ली : म्हासुर्ली (ता. राधानगरी) येथील केंद्रशाळेचे शिक्षक सतीश संभाजी चव्हाण यांना क्रांतिसूर्य फाउंडेशन कोल्हापूर यांच्यावतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार माजी खासदार राजू शेट्टी व सिनेअभिनेते स्वप्निल राजशेखर यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.

सतीश चव्हाण हे म्हासुर्ली येथील केंद्रशाळेत सध्या कार्यरत असून, यापूर्वी त्यांनी दुर्गम अशा कोनोली तर्फ असंडोलीसह अनेक गावात अनेक गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याबरोबरच शिष्यवृत्ती परीक्षा नवोदय विद्यालय स्कॉलरशिप परीक्षा, आदी बाबतीत अनेक विद्यार्थ्यांना मदत करून मोफत मार्गदर्शन केले आहे शालेय स्तरावरील त्यांनी अनेक उपक्रम राबविले असून, यापूर्वीही त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन कोल्हापूर येथील क्रांतिसूर्य फाउंडेशनच्या वतीने माजी खा. राजू शेट्टी व सिनेअभिनेते स्वप्निल राजशेखर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. यावेळी क्रांतिसूर्य फाउंडेशनचे पदाधिकारी यांच्यासह शिक्षक नेते युवराज पाटील, मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश आठल्ये उपस्थित होते.

Web Title: Award to Satish Chavan