हुपरीत तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:51 IST2021-02-05T06:51:58+5:302021-02-05T06:51:58+5:30

शशिकांत खोत याला काही कामासाठी नगरपरिषदेचा असेसमेंट उतारा हवा होता. त्यासाठी त्यांनी नगरपरिषदेकडे रीतसर मागणीही केली होती. मात्र, ...

Attempted self-immolation of a young man in Hupari | हुपरीत तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

हुपरीत तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

शशिकांत खोत याला काही कामासाठी नगरपरिषदेचा असेसमेंट उतारा हवा होता. त्यासाठी त्यांनी नगरपरिषदेकडे रीतसर मागणीही केली होती. मात्र, उतारा मिळत नव्हता. त्यामुळे आज सायंकाळी शशिकांत केबिनमध्ये येऊन ‘‘मॅडम तुम्ही मला उतारा देणार आहात की नाही’’, असे रागाने ओरडून मागणी केली होती. त्यावेळी कर निरीक्षक आडसुळ यांनी तुमची ६०००/- रुपये पाणीपट्टी थकीत आहे. तरी देखील मी मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करते आणि तुम्हाला सांगते, असे सांगितले. यावेळी शशिकांत केबिनमधून रागाने बाहेर येत नगरपरिषदेच्या कार्यालयाच्या व्हरांड्यात रागाच्या भरात सोबत आणलेले रॉकेल अंगावर ओतून घेतले आणि आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार तेथे उपस्थित असलेले पाणीपुरवठा समिती सभापती रफिक मुल्ला, नगरसेवक बाळासाहेब मुधाळे, मनोज पाटील, बांधकाम अभियंता जावेद मुल्ला, जानबा कांबळे यांच्यासह काही कर्मचारी व नागरिकांनी त्याच्या अंगावर झडप घालून पेटवून घेण्यासाठी आणलेली आगपेटी काढून घेऊन त्याला बाजूला केले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, ही घटना नगरपरिषदेच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

- - - - - ::- - - - - -

फोटो ओळी - राहत्या घराचा असेसमेंट उतारा मिळत नसल्याच्या कारणावरून शशिकांत लक्ष्मण खोत या तरुणाने आज सायंकाळी हुपरी (ता. हातकणंगले) नगरपरिषद कार्यालयाच्या व्हरांड्यातच अंगावर राॅकेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Attempted self-immolation of a young man in Hupari