शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

बिद्री साखर कारखान्यात तरुणावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सरवडे : बिद्री साखर कारखान्याची मळी वाहतूक करणारा ट्रॅक्टर पुढे घेण्याच्या कारणावरून कारखाना हद्दीत दोघा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सरवडे : बिद्री साखर कारखान्याची मळी वाहतूक करणारा ट्रॅक्टर पुढे घेण्याच्या कारणावरून कारखाना हद्दीत दोघा ट्रॅक्टरचालकांमध्ये वाद झाला. त्यातून तरुणावर कात्रीने वार केल्याने एकजण गंभीर जखमी झाला. उदय उत्तम चौगले (वय २५, रा. बिद्री) असे यामध्ये जखमी झालेल्या ट्रॅक्टरचालकाचे नाव आहे तर आरोपी हा अल्पवयीन असून त्याला मुरगूड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत घटनास्थळावरुन समजलेली माहिती अशी, बिद्री साखर कारखान्यातील मळ वाहतूक करण्यासाठी उदय चौगले व संशयित आरोपी हे दोघेजण आपले ट्रॅक्टर घेऊन रांगेत थांबले होते. यावेळी ट्रॅक्टर पुढे घेण्याच्या कारणावरुन या दोघांमध्ये वाद झाला. यातूनच संशयिताने कात्रीने उदयच्या डाव्या कानाच्या मागे, पाठीत तसेच छातीवर वार केले. त्यामुळे तो गंभीर जखमी होऊन जागेवर कोसळला.

नातेवाईकांनी जखमी उदयला तातडीने कोल्हापुरातील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच मुरगूड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन जागेचा पंचनामा केला. त्यातील संशयित आरोपीला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले असून तो अल्पवयीन असल्याचे समजते.

सदर घटनेचा तपास मुरगूडचे सपोनि विकास बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय कुमार ढेरे, बीट अंमलदार प्रशांत गोंजारे करत आहेत.

बिद्री साखर कारखान्याच्या गाडीअड्ड्यातून ट्रॅक्टर चोरीला

येथील साखर कारखान्याच्या गाडी अड्ड्यातून ट्रॅक्टर चोरीला गेल्याची घटना आज घडली. कारखाना प्रशासनाने ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. कारखाना आवारात एकाच दिवशी घडलेला खुनी हल्ला आणि ट्रॅक्टर चोरीच्या घटनेमुळे कारखाना प्रशासनाविषयी संताप व्यक्त होत आहे.