शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
3
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत
4
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
5
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
6
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
7
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
8
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
9
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
10
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
11
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
12
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
13
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
14
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
15
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
16
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
17
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
18
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
19
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
20
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
Daily Top 2Weekly Top 5

आसुर्लेकर गटाला मिळणार उभारी

By admin | Updated: May 12, 2015 23:44 IST

जिल्हा बँकेतील विजय : अडचणीच्या वेळी पद मिळाल्याने होणार बांधणी

सरदार चौगुले - पोर्ले तर्फ ठाणेजिल्हा बँकेच्या निवडणुकीत पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले येथील बाबासाहेब पाटील (आसुर्लेकर) यांना प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे. गेल्या दहा वर्षांपासून सत्तेपासून वंचित आणि चातकाप्रमाणे सत्तेची वाट पाहणाऱ्या गटाला या संधीमुळे नव्याने बाळसं (उभारी) आलं आहे. सत्तेअभावी गटाचे हे वृक्ष सुकून जात असताना जिल्हा बँकेतील संधीमुळे पाटील गट पुन्हा ताजातवाना झाला आहे. जिल्हा परिषद सदस्य आणि दत्त आसुर्ले-पोर्ले साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडल्यामुळे बाबासाहेब पाटील यांनी जिल्ह्याच्या राजकारणात मुसंडी मारली होती. पन्हाळा तालुक्यातील प्रत्येक गावात आपला स्वत:चा गट निर्माण केला. त्यांनी दत्त साखर कारखान्यावर दोनवेळा सत्ता मिळविली. परंतु, तालुक्यातील कुरघोडीच्या राजकारणामुळे कारखान्याची सूत्रे हातातून गेली. त्यामुळे कुठेच सत्ता नसल्याने गटातील कार्यकर्ते हळूहळू बाजूला गेली आहेत. नसानसांत राजकीय पिंड असणाऱ्या बाबासाहेब पाटील यांनी खचून न जाता कोणत्या ना कोणत्या कारणाने लोकांशी संपर्क ठेवला. २०११ ला त्यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढविली. त्यात त्यांचा निसटता पराभव झाला. हा पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला होता.राजकारणात थांबला तो संपला, पण पराभवाने खचून न जाता त्यांनी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी पक्षाकडून लढवली. त्यातही पराभवाला सामोरे जावे लागले. ताकद नसतानासुद्धा ही निवडणूक लढविण्याचे धाडस बाबासाहेबांनी दाखविल्याबद्दल तालुक्यात आश्चर्य व्यक्त केले जात होते. ही निवडणूक लढविली, तर त्यांना राष्ट्रवादीकडून जिल्हा बँकेची संधी मिळणार होती. म्हणूनच त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली होती. अशा वेगवेगळ्या पराभवाच्या धक्क्याने गटातील कार्यकर्ते गंभीर झाले होते. गटाला एका मोठ्या संधीची आवश्यकता होती. राजकारणात कोण कधी वरती जाईल व कोण कधी संपेल याचा अनुभव राजकीय वर्तुळात अनुभवयास मिळतो. त्याचाच प्रत्यय बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आला आहे. संपत चाललेल्या पाटील गटाला बँकेतील प्रतिनिधीत्वामुळे पद मिळाले आहे. त्यामुळे हा गट तालुक्यात पुन्हा नव्याने ताजातवाना होऊन राजकीय सारीपाठावर इतर गटाला व पक्षांना डोकीदुखी ठरणार आहे का?