कोल्हापूर : कोल्हापूरच्यामहापौरपदाचा निर्णय देखील मुख्यमंत्री घेणार असतील तर इथले नेते सक्षम नाहीत हेच यावरून स्पष्ट होते असा टोला काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी भाजपला लगावला.आमदार पाटील म्हणाले, कोल्हापूर महापालिकेचे महापौरपद शिवसेनेला मिळणार नाही, मिळालं तर त्यांचं अभिनंदन करायला हवं. कोल्हापूर आणि इचलकरंजी दोन्ही ठिकाणी महापौरपदासाठी ओबीसी आरक्षण पडले आहे. त्यामुळे आता या दोन्ही ठिकाणी मूळ भाजपचा महापौर होणार की नव्याने भाजपमध्ये आलेला महापौर होणार याची कोल्हापुरकरांना उत्सुकता आहे.२० वर्षे आमच्या विरोधात लढलेल्या कार्यकर्त्याला पद मिळणार की नवख्याला हे आम्हालाही आता बघायचं असल्याचा मिश्किल टोलाही आमदार पाटील यांनी लगावला. काँग्रेस म्हणून महापौरपदाची निवडणूक लढवायची का, याचा निर्णय आम्ही निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर बैठक घेऊन करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर किती शिल्लक, दोन दिवसांत कळेलमुंबईच्या महापौरपदाचा निर्णय दिल्लीत होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना किती दबावाखाली आहे, हे दोन-तीन दिवसांत झालेल्या घटनांवरून येते, शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर अजून शिल्लक आहे का? हे दोन दिवसांत कळेलच अशी कोपरखळीही आमदार पाटील यांनी लगावली.
Web Summary : Satej Patil criticized BJP, stating the CM's decision on Kolhapur's mayor shows local leaders' incompetence. He questioned the selection process for the mayoral post, hinting at internal BJP conflicts and doubted Shiv Sena's bargaining power.
Web Summary : सतेज पाटिल ने भाजपा पर निशाना साधते हुए कहा कि मुख्यमंत्री का कोल्हापुर के महापौर पर फैसला स्थानीय नेताओं की अक्षमता दर्शाता है। उन्होंने महापौर पद के लिए चयन प्रक्रिया पर सवाल उठाया, भाजपा के आंतरिक संघर्षों का संकेत दिया और शिवसेना की सौदेबाजी की शक्ति पर संदेह जताया।