शहरं
Join us  
Trending Stories
1
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
4
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाची पहिली महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
5
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
6
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
7
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
8
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
9
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
10
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
11
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
12
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
13
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
14
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
15
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
16
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
17
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
18
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
19
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
20
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात कुठे गळती, कुठे सुटलेले दगड, ऑइल पेंटने सौंदर्य हरवले; ‘पुरातत्त्व’कडून पाहणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 13:10 IST

आठ दिवसांत सविस्तर अंदाजपत्रक

कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील १४३ कोटींच्या कामाला मंजुरी मिळताच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने त्यावर तातडीने काम सुरू केले आहे. बुधवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांसह पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी सुमारे दीड तास मंदिर परिसराचा काेपरान्कोपरा पिंजून काढत गळती, दगडांची सुटलेली अडक, शिल्पांची दुरवस्था, रंगामुळे विद्रूप झालेल्या दगडी भिंती, सळ्या, पट्ट्यांची जोड अशा सर्व कामांची पाहणी केली. यावर पुरातत्त्व खात्याकडून पुढील आठ दिवसांत देवस्थानला अंदाजपत्रक दिले जाईल.

अंबाबाई मंदिराच्या १४४० कोटींच्या विकास आराखड्यांतर्गत पहिल्या टप्प्यात मंदिर वास्तुप्रकाराच्या जतन संवर्धनाचा समावेश आहे. या टप्प्याला मंगळवारी उच्चाधिकार समितीने मान्यता दिल्यानंतर बुधवारपासून देवस्थान समिती कामाला लागली. बुधवारी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे, पुरातत्त्व खात्याचे सहायक संचालक विलास वहाणे, देवस्थानच्या सल्लागार संस्थेचे प्रतिनिधी आर्किटेक्ट अमोल पाटणकर, समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, पुरातत्त्व विभागाचे उदय सुर्वे यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. पुढील दोन दिवस या सर्व कामांची छायाचित्रे काढली जाणार आहेत.

पाहणीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांनी आठ दिवसांत जतन-संवर्धनाच्या कामाचे सविस्तर अंदाजपत्रक देण्याची सूचना केली. अंदाजपत्रक आल्यानंतर त्याची निविदा प्रक्रिया राबवली जाईल. निधी येईल त्याप्रमाणे जतन संवर्धनाचे काम सुरू होईल.

याचे होणार जतन संवर्धन

  • मंदिराच्या छताला काही ठिकाणी गळती लागली आहे, काही ठिकाणी दगडांची अडक सुटली आहे, कुठे दगडांना भेगा पडल्या आहेत, कुठे सुटलेले दगड लोखंडी सळ्या आणि पट्ट्यांनी जोडले आहेत, दगडी बांधकामावर रंग, ऑइल पेंट लावल्याने विद्रूपीकरण झाले आहे.
  • मंदिराच्या बांधकामावरील ६४ योगिनींंसह देवदेवतांचे शिल्प, काळ पेताळ, अप्सरा या मूर्ती तसेच कोरीव काम कालौघात खराब झाले आहे.
  • मंदिराच्या आवारात अनेक खासगी मंदिरे आहेत. त्या सर्व मंदिरांचाही जतन संवर्धनात समावेश केला गेला आहे. या मंदिरांमध्येही डागडुजी तसेच मूळ अंबाबाई मंदिराला साजेसे रूप दिले जाणार आहे.