कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना तातडीने अटक करून कडक शिक्षा करावी, अशी मागणी महिला राजसत्ता आंदोलनातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांच्याकडे गुरुवारी निवेदनाद्वारे केली. ज्येष्ठ नेते पानसरे व त्यांच्या पत्नी उमाताई यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा संघटनेतर्फे जाहीर निषेध करण्यात येत आहे. पानसरे यांनी समाजातील गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी सातत्याने रस्त्यावर उतरून आंदोलने करून त्यांना न्याय दिला आहे. अशा व्यक्तीच्या मारेकऱ्यांना शासनाने तातडीने ताब्यात घेऊन कडक शिक्षा करावी, असे या निवेदनात म्हटले आहे. शिष्टमंडळात मुक्ताताई भास्कर, जयाताई कुरणे, लक्ष्मी लादे, मंगा कांबळे, गीतांजली पाटील, सुनंदा कांबळे, यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)
पानसरे यांच्या मारेकऱ्यांना अटक करा
By admin | Updated: February 27, 2015 00:19 IST
पानसरे यांनी समाजातील गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी सातत्याने रस्त्यावर उतरून आंदोलने करून त्यांना न्याय दिला आहे.
पानसरे यांच्या मारेकऱ्यांना अटक करा
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}