शिरढोण खुनातील आरोपीला अटक करा, अन्यथा मोर्चा काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:25 AM2021-03-09T04:25:25+5:302021-03-09T04:25:25+5:30

कुरुंदवाड : शिरढोण (ता. शिरोळ) येथील शोभा सदाशिव खोत या शेतमजूर महिलेचा खून होऊन दीड महिना उलटला, तरी अद्याप ...

Arrest the accused in Shirdhon murder, otherwise the morcha will take place | शिरढोण खुनातील आरोपीला अटक करा, अन्यथा मोर्चा काढणार

शिरढोण खुनातील आरोपीला अटक करा, अन्यथा मोर्चा काढणार

googlenewsNext

कुरुंदवाड : शिरढोण (ता. शिरोळ) येथील शोभा सदाशिव खोत या शेतमजूर महिलेचा खून होऊन दीड महिना उलटला, तरी अद्याप खुनाचा तपास लागलेला नाही. खुन्याला त्वरित शोधून त्याला अटक करावी. अन्यथा २२ मार्च रोजी पोलीस ठाण्यावर शेतमजूर महिलांचा मोर्चा काढण्याचा इशारा शेतमजूर संघटनेच्यावतीने कुरुंदवाड पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.

शेतमजूर महिला खोत हिचा २५ जानेवारी रोजी मजुरी करून परतत असताना अज्ञाताने मानेवर वार करून खून केला होता. या घटनेला दीड महिना उलटला तरी अद्याप खुन्याचा तपास लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करून येथील शेतमजूर संघटनेच्या शिष्टमंडळाने पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक निरावडे यांची भेट घेऊन निवेदन दिले.

शिष्टमंडळात शेतमजूर महिला संघटना अध्यक्षा शोभा कोरे, विश्वास बालीघाटे, सुरेश सासणे, आप्पा बंडगर आदी सहभागी झाले होते.

फोटो - ०८०३२०२१-जेएवाय-०२

फोटो ओळ -

शिरढोण (ता. शिरोळ) येथील शेतमजूर महिला शोभा खोत हिच्या खुनाचा उलगडा व्हावा, या मागणीचे निवेदन शेतमजूर संघटनेच्यावतीने पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांना देण्यात आला.

Web Title: Arrest the accused in Shirdhon murder, otherwise the morcha will take place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.