शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

२५३ कोटींची थकबाकी, वसुली ४० कोटीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:25 IST

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाची थकबाकी २५३ कोटी इतकी असून, त्यापैकी मागच्या वर्षापासून केवळ ४० कोटींची वसुली झाली आहे. ...

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाची थकबाकी २५३ कोटी इतकी असून, त्यापैकी मागच्या वर्षापासून केवळ ४० कोटींची वसुली झाली आहे. त्यामुळे कर्मचारी संघाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे यापुढील तीन महिन्यांत जर ७५ कोटींची वसुली झाली तरच सर्व कर्मचाऱ्यांना सातव्या आयोगानुसार वेतन मिळणार आहे.

घरफाळा विभागातर्फे प्रत्येक वर्षी केवळ त्या-त्या वर्षाचे वसुलीचे उद्दिष्ट जाहीर केले जात होते. मागील थकबाकीचे आकडे कधीही जाहीर केले जात नव्हते. त्यामुळे नेमकी थकबाकी किती आहे, याचा अंदाज कोणालाच येत नव्हता. माजी नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांनी हा मुद्दा उचलून धरला होता. घरफाळा विभागाची एकूण थकबाकी किती आहे, हे एकदा जाहीर करा, अशी त्यांनी मागणी केली होती.

त्यानुसार घरफाळा विभागातील चौकशी सुरू असतानाच मागील थकबाकीची माहिती संकलित करण्याचे कामही सुरू होते. गेल्या काही वर्षांची ही थकबाकी असून ती ११२ कोटींच्या घरात आहे. त्यावर ८६ कोटींचा दंड आकारला आहे. तीन कोटींची शास्ती लावण्यात आली आहे. चालू वर्षाची मागणी ५२ कोटी आहे. थकबाकीची ही एकूण रक्कम २५३ कोटींवर जाते. प्रत्यक्षात मागच्या वर्षापासून केवळ ४० कोटींची वसुली झाली आहे.

महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची मागणी केली आहे. जर सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पगार मिळाला नाही तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी कर्मचारी संघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती.

चर्चेत राज्य सरकारने ठरवून दिलेले निकष कर्मचारी संघाने मान्य केले होते. मागील थकबाकीच्या ५० टक्के, तर चालू मागण्यांच्या नव्वद टक्के इतकी वसुली करण्यात येईल, असे कर्मचारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले होते. एकूण थकबाकीपैकी जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या तीन महिन्यांत मिळून प्रत्येक महिन्याला २५ कोटी याप्रमाणे ७५ कोटींची वसुली होणे अपेक्षित आहे; परंतु वसुलीची गती एकदम संथ आहे. जानेवारीत २५ कोटी वसूल व्हायलाच पाहिजे; परंतु ती सोमवार (दि. १८) पर्यंत केवळ तीन कोटीच वसूल झाली. त्यामुळे वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण होणे केवळ अशक्य दिसत आहे.

वसुली झाली तरच पगारवाढ

कर्मचारी संघाने दिलेल्या हमीनुसार उद्दिष्टाप्रमाणे वसुली झाली तरच पगारवाढ मिळणार आहे. मंगळवारी प्रशासनातर्फे ही आकडेवारी देताना ‘आधी वसुली करा; तर पगारवाढ मिळेल,’ असा जणू इशाराच दिला आहे. त्यामुळे भविष्यकाळात ‘प्रशासन विरुद्ध कर्मचारी’ असा संघर्ष अटळ आहे.