म्हाकवेत स्वयंसेवकांची फौज पुन्हा रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:24 IST2021-05-18T04:24:13+5:302021-05-18T04:24:13+5:30

म्हाकवे(ता.कागल)येथील नागरिकांचे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून संरक्षण व्हावे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याच्या उद्देशाने स्वयंम प्रतिष्ठानचे ३३ स्वयंसेवक रस्त्यावर उतरून पुन्हा ...

An army of volunteers is on the road again | म्हाकवेत स्वयंसेवकांची फौज पुन्हा रस्त्यावर

म्हाकवेत स्वयंसेवकांची फौज पुन्हा रस्त्यावर

म्हाकवे(ता.कागल)येथील नागरिकांचे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून संरक्षण व्हावे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याच्या उद्देशाने स्वयंम प्रतिष्ठानचे ३३ स्वयंसेवक रस्त्यावर उतरून पुन्हा पहारा देत आहेत.येथील मुख्य बसस्थानक चौकासह गावात प्रवेश करणाऱ्या रस्त्यावर थांबून मास्कची सक्ती तसेच विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करत आहेत.यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारीही परिश्रम घेत आहेत.येथील स्वयंसेवकांच्या कामगिरीचे परिसरात कौतुक होत आहे.

अनेकजण विनामास्क फिरत होते. त्यांना ग्रामपंचायतीची सामान्य पावतीद्वारे १००रुपये दंड करण्यात आला.तसेच लाॅकडाऊनचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना वाहनावरील स्पिकरद्वारे करण्यात आल्या.

दरम्यान, या स्वयंसेवकांनी गतवर्षीही आदर्शवत काम केले होते.त्यामुळे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी या सर्वांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला होता.

Web Title: An army of volunteers is on the road again