आणूर-बस्तवडे पूल पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:24 IST2021-03-08T04:24:36+5:302021-03-08T04:24:36+5:30

म्हाकवे : कागल तालुक्यातील वेदगंगा नदीवरील आणूर-बस्तवडे येथील रखडलेल्या बहुचर्चित पुलाचे काम येत्या महिनाभरात पूर्ण करून येत्या पावसाळ्यापूर्वी या ...

The Anur-Bastawade bridge will be completed before the monsoon | आणूर-बस्तवडे पूल पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल

आणूर-बस्तवडे पूल पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल

म्हाकवे :

कागल तालुक्यातील वेदगंगा नदीवरील आणूर-बस्तवडे येथील रखडलेल्या बहुचर्चित पुलाचे काम येत्या महिनाभरात पूर्ण करून येत्या पावसाळ्यापूर्वी या पुलावरून वाहतूक सुरू करण्याचा मनोदय खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केला. तशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

या पुलाचे ७५ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. मात्र, येथील शेतकऱ्यांनी भरपाई न मिळाल्यामुळे काम बंद पाडले आहे. याची प्रत्यक्ष पाहणी करत खासदार मंडलिक यांनी शेतकऱ्यांशी तसेच, शासकीय अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

बस्तवडेकडील शेतकऱ्यांना भरपाई मिळाली आहे. उर्वरित आणूरकडील शेतकऱ्यांच्याही नुकसान भरपाईचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी सदा साखरच्या संचालिका राजश्री चौगुले, सरपंच रेखा तोडकर, उपसरपंच उमेश पाटील, बाळासाहेब चौगुले, चंद्रकांत खेडे, सचिन चौगुले, भीमराव खोत, सुभाष चौगुले, सुरेश चौगुले आदी उपस्थित होते.

कॅप्शन

आणूर-बस्तवडे येथील वेदगंगा नदीवरील अपूर्ण अवस्थेत असणारा पूल.

दत्ता पाटील-म्हाकवे

Web Title: The Anur-Bastawade bridge will be completed before the monsoon