शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
2
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
3
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
4
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
5
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
6
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
7
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
8
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
9
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
10
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
11
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
12
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
13
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
14
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
15
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
16
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
17
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
18
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
19
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
20
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
Daily Top 2Weekly Top 5

निनावी तक्रार अर्ज आता बेदखल

By admin | Updated: October 16, 2015 00:02 IST

डॉ. पी. एस. मीना : सर्व कार्यालयांना आदेश

एकनाथ पाटील -- कोल्हापूर -पूर्ववैमनस्यातून किंवा दबावाच्या भीतीने प्रशासकीय कार्यालयाकडे दाखल होणाऱ्या निनावी व खोट्या सहीने केलेल्या तक्रारींची आता दखल घेतली जाणार नाही. याबाबत अप्पर मुख्य सचिव डॉ. पी. एस. मीना यांनी निनावी व खोट्या तक्रारींची दखल घेऊ नये, असा आदेश मंत्रालयासह राज्यातील सर्व प्रशासकीय कार्यालयांना काढला आहे. प्रशासकीय कार्यालयांमध्ये महसूल, पोलीस विभागाकडे सर्वाधिक निनावी तक्रारी दाखल होत असतात. आजअखेर अशा तक्रारींची तत्काळ दखल घेऊन चौकशी केली जात असे; परंतु बहुतांश तक्रार अर्ज हे प्रतिस्पर्धी व्यक्तीला बदनाम करण्यासाठी कार्यालयाकडे पाठविले जात असल्याचे निदर्शनास आल्याने केंद्र सरकारच्या १८ आॅक्टोबर २०१३ च्या शासन नियमानुसार अप्पर मुख्य सचिव डॉ. मीना यांनी तक्रारदाराचे नाव व पत्ता नोंद केलेला नाही, अशा निनावी तक्रारींमध्ये कोणत्याही स्वरूपाची माहिती अंतर्भूत असली तरी त्यावर कार्यवाही करण्यात येऊ नये, ती तक्रार फक्त दफ्तरी नोंद करावी, असा आदेश काढला आहे. या आदेशाप्रमाणे सर्वच शासकीय कार्यालयांतून कार्यवाही करण्यात येणार आहे. आरोपात तथ्य असल्यास दखल ज्या तक्रारींमध्ये पडताळणी करता येऊ शकेल, असे आरोप केलेले आहेत, अशा तक्रारी संबंधात प्रशासकीय किंवा मंत्रालयाने त्याची दखल घ्यावी. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मान्यतेने ती तक्रार मूळ तक्रारदाराकडे पाठवून ती त्याने स्वत: केली आहे काय, याबाबत खात्री करून घेण्यात यावी. त्यांच्याकडून पंधरा दिवसांत प्रतिसाद मिळाला नाही तर स्मरणपत्र पाठविण्यात यावे. त्यानंतरही माहिती प्राप्त न झाल्यास ही तक्रार खोट्या नावाची असल्याचे नोंद करून दफ्तरी दाखल करण्यात यावी. तसेच आपण स्वत: तक्रार केल्याचे मान्य केल्यास त्यावर कार्यवाही करताना तक्रार अर्जातील नाव, पत्ता गोपनीय ठेवून त्याची छायांकित प्रत काढून ती चौकशीसाठी संबंधित यंत्रणांकडे द्यावी व अर्जाप्रमाणे कार्यवाही करावी, असे या आदेशात म्हटले आहे. हप्ता वसुलीची तक्रार गंगावेश परिसरातील ऋणमुक्तेश्वर मंदिर परिसरात ग्रामीण भागातील शेतकरी, व्यापारी नेहमी भाजीपाला विक्रीसाठी बसत असतात. त्यांच्याकडून या परिसरातील काही तालमीचे कार्यकर्ते दमदाटी करत हप्ता गोळा करत असल्याचा निनावी अर्ज लक्ष्मीपुरी पोलिसांकडे आला. त्यानुसार तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी परिसरातील काही कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी केली असता त्यामध्ये तथ्य नसल्याचे निष्पन्न झाले.