सावित्री महिला औद्योगिक संस्थेची वार्षिक सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:27 IST2021-09-22T04:27:43+5:302021-09-22T04:27:43+5:30

तात्यासाहेब कोरेनगर येथील सावित्री माहिला औद्योगिक संस्थेची ३६ वी ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. अध्यक्षा कोरे म्हणाल्या, कोरोना ...

Annual meeting of Savitri Mahila Industrial Society | सावित्री महिला औद्योगिक संस्थेची वार्षिक सभा

सावित्री महिला औद्योगिक संस्थेची वार्षिक सभा

तात्यासाहेब कोरेनगर येथील सावित्री माहिला औद्योगिक संस्थेची ३६ वी ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली.

अध्यक्षा कोरे म्हणाल्या, कोरोना महामारीच्या या २ वर्षाच्या संकट काळात संस्थेने सर्व नियमांचे पालन करत ४ कोटींची वार्षिक उलाढाल केली. अहवाल सालात ४२ लाखांचा नफा झाला असून, संस्थेकडे २६ लाखांच्या ठेवी आहेत.

वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर

यांनी सावित्री महिला औद्योगिक संस्थेत लवकरच आधुनिक मशिनरी

बसविणार असल्याचे सांगून कोरोना काळात संस्थेने नेत्रदीपक प्रगती केल्याचे सांगितले.

संस्थेच्या उपाध्यक्षा मुग्धा येडूरकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर संचालिका सुनीता नाईक यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला. अकाउंट्स अधिकारी मोहन जाधव यांनी नोटीसवाचन केले.

व्यासपीठावर उपाध्यक्षा मुग्धा मोहन येडूरकर, वारणा दूध संघाच्या माजी संचालिका शोभा साखरपे, भगिनी मंडळाच्या संचालिका शारदा महाजन, माधवी देशपांडे, वाशी शाखेचे जनरल मॅनेजर एस. एम. पाटील, अकाउंट्स सल्लागार सुधीर कामेरीकर, फॅक्टरी मॅनेजर श्रीधर बुधाले, प्रवीण शेलार, शरद शेटे, अनिल हेलें, आर. व्ही. देसाई, डॉ. अशोक पाटील, प्रकाश पाटील, संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र जाधव, अनिल लंबे, एन. ए. पाटील उपस्थित होते. सदस्या हेमा बुधाले यांनी आभार मानले .

फोटो ओळी - तात्यासाहेब कोरेनगर येथील सावित्री महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या ३६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षा शुभलक्ष्मी विनय कोरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा मुग्धा मोहन येडूरकर, संचालिका शोभा साखरपे, शारदा महाजन, माधवी देशपांडे, सर्व संचालिका.

Web Title: Annual meeting of Savitri Mahila Industrial Society