शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

...अन् पानसरेंच्या जिवावर बेतले

By admin | Updated: April 4, 2015 00:04 IST

बी. जी. कोळसे-पाटील : गारगोटीत आनंदराव मोरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रम

गारगोटी : शब्द प्रामाण्यवाद संपविण्यासाठी चार्वाकापासून संतश्रेष्ठ तुकाराम ते नरेंद्र दाभोलकरपासून पानसरेंपर्यंत सर्वांची हत्या आजअखेर सुरू असून, पानसरेंनी करकरेंच्या हत्येचे मूळ शोधण्याचा केलेला प्रयत्नच त्यांच्या जिवावर बेतला, असे परखड मत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे-पाटील यांनी व्यक्त केले. ते गारगोटी येथे इंजुबाई सभागृहात कॉ. आनंदराव मोरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘कॉ. गोविंदराव पानसरे यांचे खरे खुनी कोण?’ या विषयावरील व्याख्यानप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार श्रीपतराव शिंदे होते.यावेळी कोळसे-पाटील म्हणाले, ब्राह्मण्यवादाचे पुरस्कर्ते असणाऱ्या महात्मा गांधींनी स्वातंत्र्याची चळवळ बहुजनांच्या हातात दिल्याच्या रागातून गोडसे प्रवृत्तीने त्यांची हत्या केली, तर करकरे यांनी मालेगावसह राज्यातील बॉम्बस्फोटांच्या मुळाशी जाऊन खरे सूत्रधार बाहेर काढल्यानेच नियोजनबद्धरीत्या त्यांची हत्या केली. धर्मांध शक्तींना बहुजनांबरोबरच देशावरही सत्ता अबाधित ठेवायची असल्यानेच त्यांच्या विचारांच्या आडवे येणाऱ्यांची हत्या होत आहे. विचारांची लढाई बंदुकीच्या गोळीने संपत नसून, त्यातून नव्या विचारांचे कार्यकर्ते जन्मास येत आहेत. हे धर्मांध शक्तीने लक्षात घ्यावे.यावेळी अध्यक्षीय भाषणात माजी आमदार श्रीपतराव शिंदे म्हणाले, नथुरामाच्या विचारांच्या लोकांनी दाभोलकर, पानसरेंचा खून केला. पानसरेंबद्दल केवळ भाषणे करून न थांबता त्यांच्या विचारांचा जागर केला पाहिजे. कार्यक्रमाला माजी आमदार बजरंग देसाई, प्रा. बाळ देसाई, सरपंच छाया सारंग, वसंतराव देसाई, मधुआप्पा देसाई, भाऊसाहेब देसाई, गोपाळ कांबळे, पी. एस. कांबळे, डॉ. आर. एस. कांबळे यांच्यासह मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.समारंभाचे संयोजन आनंद बहुद्देशीय सामाजिक संस्थेने केले होते. कॉ. बाबूराव निंबाळकर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. छाया मोरे यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी करून दिला. व्ही. जे. कदम यांनी सूत्रसंचालन, तर कॉ. व्यंकट मोरे यांनी आभार मानले.