शाहू कृषी संघाच्या अध्यक्षपदी अनंत फर्नांडिस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:51 IST2021-02-05T06:51:53+5:302021-02-05T06:51:53+5:30

नुकतीच निवडणूक बिनविरोध झालेल्या येथील शाहू ग्रुपअंतर्गत श्री छत्रपती शाहू कृषी सहकारी खरेदी-विक्री ...

Anant Fernandes as President of Shahu Krishi Sangh | शाहू कृषी संघाच्या अध्यक्षपदी अनंत फर्नांडिस

शाहू कृषी संघाच्या अध्यक्षपदी अनंत फर्नांडिस

नुकतीच निवडणूक बिनविरोध झालेल्या येथील शाहू ग्रुपअंतर्गत श्री छत्रपती शाहू कृषी सहकारी खरेदी-विक्री सोसायटीच्या अध्यक्षपदी अनंत फर्नांडिस (मुरगूड) यांची, तर उपाध्यक्षपदी अरुण शिंत्रे (सोनगे) यांची बिनविरोध निवड झाली. जिल्हा विभागीय सह. उपनिबंधक अरुण काकडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेस शाहू ग्रुपचे अध्यक्ष व संघाचे संचालक समरजित घाटगे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी समरजित घाटगे म्हणाले, या संघाची स्थापना स्व. विक्रमसिंहराजे घाटगे यांनी अल्पभूधारक शेतकरी डोळ्यासमोर ठेवून केली आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे व इतर कृषी उपयोगी निविष्ठा उपलब्ध करून देण्याची परंपरा निर्माण केली आहे. त्यामध्ये भर घालावी. यावेळी सर्व नूतन संचालक उपस्थित होते. अध्यक्ष- उपाध्यक्ष यांचा सत्कार घाटगे यांच्या हस्ते करण्यात आला.

Web Title: Anant Fernandes as President of Shahu Krishi Sangh