शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील विकासवाडीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम साकारणार, जिल्हा क्रिकेट असोसिएशन करणार खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 12:53 IST

यापूर्वी ८० च्या दशकात कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर भारत विरुद्ध वेस्ट इंडीज सामना रंगला होता

कोल्हापूर/मुंबई : 'क्रीडा पंढरी' अशी ओळख असलेल्या कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम निर्माण करण्यासाठी विकासवाडी (ता. करवीर) येथील १२ हेक्टर ७६ आर. (३२ एकर) शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यास मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या स्टेडियममुळे कोल्हापूरच्या क्रीडा विकासाला चालना मिळणार आहे.

कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनने यासाठी पाठपुरावा केला होता. विकासवाडीत महाराष्ट्र औद्योगिक मंडळाच्या ताब्यात असलेल्या ४२१ हेक्टर जमिनीपैकी १२ हेक्टर जमीन क्रीडा विभागाला उपलब्ध करून द्यावी, असे आदेश दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २०२४ मध्ये दिले आहेत. त्यानुसार सध्या महसूल विभागाच्या ताब्यात असलेली १२ हेक्टर ७६ आर जमीन देण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

आंतरराष्ट्रीय सामने पाहण्याची संधी

यापूर्वी ८० च्या दशकात कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर भारत विरुद्ध वेस्ट इंडीज सामना रंगला होता. त्यानंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना कोल्हापुरात झालेला नाही. आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम नसल्याने कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने आयोजित करण्यात येत नव्हते. त्यामुळे विकासवाडीत जागेसाठी पाठपुरावा सुरू होता त्याला अखेर यश आले आहे. हे स्टेडियम पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूरकरांना आंतरराष्ट्रीय सामने पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

जिल्हा क्रिकेट असोसिएशन करणार स्टेडियमचा खर्च

  • या स्टेडियमसाठी केवळ जमीन शासनाच्यावतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागास भौगाधिकार मूल्यरहित व महसूलमुक्त (विनामूल्य) तसेच कब्जेहक्काने ही जमीन देण्यात येणार आहे.
  • ही जमीन शालेय शिक्षण व क्रीडा विभागास प्राप्त झाल्यानंतर शासनाच्या नियम, तरतुदी व धोरणांचा विचार करून जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांना आवश्यकतेनुसार जागा उपलब्ध करून देण्यासाठी कराराची कार्यवाही करण्यात येणार आहे.
  • स्टेडियम उभारण्यासाठी येणारा खर्च हा कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन करणार आहे.


पाच जिल्ह्यांतील खेळाडूंना लाभ

या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारल्यानंतर कोल्हापूरमह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उदयोन्मुख प्रतिभावान खेळाडूंना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. तसेच क्रिकेटच्या नकाशावर कोल्हापूरची ओळख ठळक बनणार आहे.

हा निर्णय कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार असून, कोकण व परिचा महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील अनेक होतकरू क्रिकेटपटूना याचा मोठा लाभ होणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापूरमधील क्रिकेटप्रेमी आणि खेळाडूनी पाहिलेले स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे - संभाजीराजे, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन
 

कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे केलेल्या पाठपुराव्याला यश आले. लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य क्रिकेट स्टेडियम आकाराला येऊन कोल्हापूरच्या क्रीडापरंपरेला चालना मिळेल - अमल महाडिक, आमदार कोल्हापूर दक्षिण

कोल्हापुरात क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. याआधीच येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम होणे अपेक्षित होते. मात्र, आता ते स्वप्न पूर्ण होत असून, कोल्हापूरसह आसपासच्या जिल्ह्यांतील खेळाडूंना त्याचा मोठा लाभ होणार आहे. - नंदू बामणे, माजी क्रिकेटपटू कोल्हापूर

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur to Get International Cricket Stadium; Association to Bear Cost

Web Summary : Kolhapur's Vikaswadi will house an international cricket stadium, boosting sports. The District Cricket Association will fund construction on land sanctioned by the state government. This offers opportunities for players across five districts.