शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

अमोल, प्रियांका प्रथम

By admin | Updated: November 27, 2014 00:14 IST

शहीद मॅरेथॉन स्पर्धा : धावपटूंनी दिला ‘क्लीन सिटी’चा संदेश

सांगली : ‘क्लीन सिटी’चा संदेश देत आज, बुधवारी अवघी सांगली शहीद मॅरेथॉन स्पर्धेत धावली. पुरुषांमध्ये जतच्या अमोल पडोळकरने, तर महिलांमध्ये सांगलीच्या प्रियांका पवारने प्रथम क्रमांक पटकावला.शहीद अशोक कामटे स्मृती फौंडेशनतर्फे तिसऱ्या शहीद मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन आ. सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते निशाण दाखवून झाले. विश्रामबाग चौकातून स्पर्धेस प्रारंभ झाला. अध्यक्षस्थानी स्वातंत्र्यसेनानी बापूसाहेब पाटील होते. पारितोषिक वितरण उद्योजक गिरीष चितळे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते झाले. सचिन हरोले यांनी स्वागत केले. मुस्तफा मुजावर यांनी आभार मानले. यावेळी नगरसेवक संतोष पाटील, प्रा. प्रदीपकुमार चव्हाण, अमोल झांबरे, अ‍ॅड. एस. एम. पखाली, तिमीर आरवारे, प्रा. पी. एस. कांबळे, सुरेश चव्हाण, उदयकुमार पाटील, अपघातमित्र अरुणोदय पै, आदी उपस्थित होते. पंच म्हणून सुभाष सूर्यवंशी, संजय पाटील, बापू समलेवाले, लक्ष्मी पाटील, जितेंद्र पाटील यांनी काम पाहिले. राहुल कांबळे, इनायत तेरदाळकर, योगेश रोकडे यांनी संयोजन केले. स्पर्धेचा अनुक्रमे एक ते पाच क्रमांकांपर्यंतचा अंतिम निकाल असा : खुला गट : पुरुष : अमोल पडोळकर, विशाल शेंडगे, अनिल गडदे, अंतोषकुमार व्हनकडे, सुनील माने. महिला : प्रियांका पवार, विद्याश्री देसाई, सुनीता पाटील, प्रियांका घार्गे, मयूरी मायाण्णा. १४ वर्षांखालील गट : मुले : सतीश सरगर, राहुल कारंडे, परमानंद मसाळे, विनायक मसाळे, ओंकार व्हनमाने. मुली : प्रियांका जाधव, कोमल निकम, मोहिनी इसापुरे, साक्षी करमुथे, अमृता कांबळे. २० वर्षांखालील गट : मुले : रोहित कळेकर, आकाश चौगुले, मोहन परीट, प्रताप पोपळे, नरेश मुखीया. मुली : प्रियाकुमारी खरवार, धनश्री गोर, रेवती राजमाने, पूनम हाक्के, मनीषा वाघमोडे. (क्रीडा प्रतिनिधी)