शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: थंडी, धुक्यात हरवला अंबाबाईचा उत्तरायण किरणोत्सव, गरुड मंडप कमानही अडचणीची

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 18:00 IST

चरणस्पर्शही नाही

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्रीअंबाबाईचा अखंड उत्तरायण किरणोत्सव यंदा निराशेत गेला. किरणोत्सवाच्या गेल्या तीन दिवसांत एकदाही मावळतीची सूर्यकिरणे अंबाबाई मूर्तीपर्यंत पोहोचू शकली नाहीत. या वर्षी थंडी लांबल्याचा हा परिणाम असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. यासह नव्याने होत असलेल्या गरुड मंडप कमानीपैकी एक कमान आणि जोडलेली एक पट्टीही किरणोत्सवाच्या अडथळ्याचे कारण ठरणारे आहे.

श्रीअंबाबाईचा किरणोत्सव पाच दिवसांचा असतो. त्यातीन मुख्य तीन दिवस. सोमवारी किरणोत्सवाचा अखेरचा दिवस होता. या पाचपैकी एकादाही मावळतीची सूर्यकिरणे अंबाबाईच्या मूर्तीपर्यंत पोहोचू शकली नाहीत. सोमवारी तर ही किरणे गरुड मंडपातील सदरेपर्यंतच येऊन लुप्त झाली. नव्या वर्षातील किरणोत्सवात साधा चरणस्पर्शही झाला नाही. यंदा थंडीचा कडाका जास्त होता, शिवाय थंडीचा कालावधीही लांबला. आत्ताही रोज मध्यरात्री थंडी असते. ढगाळ वातावरण, धूलिकण याचा परिणाम सूर्यकिरणांच्या तीव्रतेवर झाला.

कमीनात आत्ताच हवी दुरुस्ती...

यंदा सूर्यकिरणांची तीव्रता नव्हती हे खरेच, पण नव्याने होत असलेल्या गरुड मंडपाची महाद्वारसमोरील कमान किरणांच्या प्रवासात अडथळा ठरत असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. अंबाबाई मूर्तीच्या चेहऱ्यासमोर उभे राहून समोर बघितले की, गरुड मंडपाची कमान आणि त्या खाली लावलेली पट्टी दिसत आहे. आत्ता गरुड मंडप उभारणीच्या अवस्थेत आहे, तोपर्यंतच कमान वर उचलून घेणे किंवा त्यात दुरुस्ती करणे गरजेचे आहे. एकदा गरुड मंडप उभारल्यानंतर काही करता येणार नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur's Ambabai Utranayan Kiranotsav Fails Due to Fog, Construction Obstacles

Web Summary : Ambabai's Utranayan Kiranotsav in Kolhapur disappointed devotees as sunlight failed to reach the idol due to prolonged cold, fog, and construction obstructing the rays. Concerns rise about the new Garuda Mandap archway's impact.