शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

खणदाळच्या अमितचा मराठी चित्रपटांत आवाज

By admin | Updated: March 9, 2017 23:50 IST

‘रे पावसा’ गीत : ‘मित’च्या यशाने खणदाळसारख्या कन्नड-मराठी मिश्रभाषिक गावाचे नाव चित्रपटसृष्टीत

संजय थोरात -- नूल  -व्हाईट ओनियन इंटरटेनमेंट या बॅनरखाली तयार झालेला ‘प्रेमाय नम्:’ हा मराठी चित्रपट नुकताच प्रसिद्ध झाला. या चित्रपटात खणदाळ (ता. गडहिंग्लज) येथील अमित अशोक गोरुले या युवा गायकाने पार्श्वगायन केले आहे. त्याच्या आवाजातील ‘रे पावसा’ हे गीत सर्वत्र गाजत आहे. अमितच्या या यशाने खणदाळसारख्या कन्नड-मराठी मिश्रभाषिक गावाचे नाव बॉलिवूडच्या नकाशावर आले आहे.अमितला चौथ्या वर्षांपासून गायनाची आवड आहे. संगीत विशारद मच्छिंद्र बुवा यांनी त्याला घडविले आहे. अनेक वर्षे तो कन्नड, मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे. या क्षेत्रात करिअर करायचे या जिद्दीने आर्थिक परिस्थितीवर मात करीत वेळप्रसंगी उपाशिपोटी राहून त्याने हे यश मिळविले. उत्तम चोरडे निर्मित, जगदीश वाठारकर यांचे दिग्दर्शन असलेला ‘प्रेमाय नम्:’ मराठी चित्रपट पश्चिम महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.चंद्रशेखर जानवाडे व के. संदीपराज यांचा संगीत साज आणि चित्रपटात टायटल साँग असलेले ‘रे पावसा’ या गाजत असलेल्या गीतास अमितचा सुरेल आवाज लाभला आहे. देवेंद्र चौगुले, रूपाली कृष्णराव, सुरेखा कुडची, प्रकाश धोत्रे, भरत दैनी यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.या चित्रपटाचे रामोजी फिल्म सिटी, मालवण, कागल, कोल्हापूर, सांगली येथे चित्रीकरण झाले आहे. मालवण किनारपट्टीवर समुद्रात डायव्हिंगच्या माध्यमातून या चित्रपटाचे प्रमोशन झाले. मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच संपूर्ण गीत पाण्याखाली चित्रित करण्यात आले. पावसाळ्यातील ‘रे पावसा’ गीत अमितने गावून बॉलविूडमध्ये प्रवेश केला आहे. ‘महारथा’, ‘कार मुगीलु’ हे दोन कन्नड चित्रपट प्रदर्शनाच्या तयारीत आहेत. त्यात अमितची तीन गीते आहेत, तर इन्फिनिटी चित्रपटाच्या चित्रीकरणास प्रारंभ झाला आहे.कॉ. गोविंद पानसरेंच्या जीवनावरील ‘तरंग’ लघुपटास त्याचे संगीत व पार्श्वगायन आहे. ‘ओ जीव वे’ हा त्याचा स्वत:चा सात गीतांचा कन्नड अल्बम प्रसिद्ध झाला आहे. ‘जागो इन्सानो’ या त्याच्या ख्रिश्चन गीतांच्या अल्बमला परदेशात मागणी आहे. महाराष्ट्रातील या युवा गायक संगीतकाराने कर्नाटकातील चित्रपटसृष्टीत योगदान दिले आहे.