शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

व्यावसायिकांना दुकाने उघडण्याची परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2021 6:47 PM

CoronaVirus collector kolhapur -ब्रेक द चेन अंतर्गत सरसकट सर्व दुकाने बंद करण्याचा नियम अन्यायकारक आहे. तरीही पालकमंत्री व प्रशासनाने केलेल्या आवाहनानंतर व्यावसायिकांनी मंगळवारी दुपारनंतर दुकाने बंद ठेवली. मात्र, वरील नियमांबाबत नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आहे. तसेच कोल्हापुरात रुग्णांची संख्या तुलनेने कमी असल्याने व्यावसायिकांना सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सने बुधवारी केली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले.

ठळक मुद्देव्यावसायिकांना दुकाने उघडण्याची परवानगी द्या कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर : ब्रेक द चेन अंतर्गत सरसकट सर्व दुकाने बंद करण्याचा नियम अन्यायकारक आहे. तरीही पालकमंत्री व प्रशासनाने केलेल्या आवाहनानंतर व्यावसायिकांनी मंगळवारी दुपारनंतर दुकाने बंद ठेवली. मात्र, वरील नियमांबाबत नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आहे. तसेच कोल्हापुरात रुग्णांची संख्या तुलनेने कमी असल्याने व्यावसायिकांना सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सने बुधवारी केली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले.दुकाने बंदचा आदेश आल्यानंतर सोमवारी आम्ही पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेऊन हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली होती. त्यांनी सकारात्मक निर्णय घेऊ असे सांगून एक दिवसाचा अवधी मागितला होता. मंगळवारी सकाळी सर्वांनी व्यवसाय सुरू ठेवला. मात्र, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर दुपारी तीन वाजता दुकाने बंद करून आम्ही प्रशासनाला सहकार्य केले आहे. मात्र, या निर्णयाबाबत व्यापारी व नागरिकांमध्ये नाराजी आहे. तसेच कोल्हापुरातील रुग्ण संख्या नियंत्रणात आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था बळकटीसाठी सर्व आस्थापनांना सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात यावी. व्यावसायिकांकडून सर्व नियमांचे पालन केले जाईल. असे निवेदनात म्हटले आहे.यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, संजय पाटील, धनंजय दुग्गे, जयेश ओसवाल, माजी अध्यक्ष आनंद माने, प्रदीपभाई कापडिया, अजित कोठारी, प्रशांत शिंदे, राहुल नष्टे, भरत ओसवाल, संपत पाटील, संभाजी पोवार, सराफ संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड आदी उपस्थित होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर