शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

युतीमध्ये ‘नमना’लाच खडाखडी

By admin | Updated: June 12, 2015 00:02 IST

महापालिका निवडणूक : स्वबळावर लढण्याची खुमखुमी

कोल्हापूर : केंद्रात, राज्यात सत्तेत व महापालिकेतही युती असलेल्या शिवसेना व भाजपमध्ये महापालिकेच्या निवडणुकीवरून आतापासूनच खडाखडी सुरू झाली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांत या निवडणुकीसाठी युती झालीच, तर जागावाटपासून अनेक मुद्द्यांवर कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.कोण बरोबर आले तर त्यांना घेऊन; अन्यथा स्वबळावर, अशी डरकाळी भाजपने फोडल्यावर शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनीही त्याला बुधवारी झालेल्या मेळाव्यात जोरदार प्रत्युत्तर दिले. अधिवेशन यशस्वी झाले म्हणजे महापालिका निवडणूक जिंकता येत नसल्याची टीकाही आमदारांनी भाजपवर केली आहे.केंद्रात, राज्यात भाजपने जोरदार यश मिळविले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे भाजपचे कमळ सगळीकडे उमलले. त्यामुळे आता महापालिकेतही कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्या पक्षाच्या संपर्कात आहेत. देशाला अजून नसले तरी किमान भाजपला तरी ‘अच्छे दिन’ आले असल्याचे चित्र सध्या आहे. त्यामुळेच आपला पारंपरिक सोबती असलेल्या शिवसेनेला आव्हान दिले जात आहे. आमदार क्षीरसागर यांच्या दृष्टीने ही निवडणूक म्हणजे त्यांच्या विधानसभा निवडणुकीचा पाया मजबूत करण्याची संधी आहे. क्षीरसागर आमदार झाल्यापासूनची ही महापालिकेची दुसरी निवडणूक आहे. त्यामुळे महापालिकेवर भगवा फडकविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीला तोंड देत असतानाच त्यांना पुन्हा मित्रपक्ष असलेल्या भाजपशीही लढावे लागत आहे. त्याची महत्त्वाची दोन-तीन कारणे आहेत. मुळात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व आमदार क्षीरसागर यांच्यामध्ये तितकेसे चांगले संबंध नाहीत. पाटील यांच्या स्वीय साहाय्यकास क्षीरसागर समर्थकांकडून मारहाण झाल्यापासून हा वाद सुरू झाला. त्यात विधानसभेला भाजपच्या महेश जाधव यांना चाळीस हजारांवर मते मिळाल्याने क्षीरसागर पुन्हा अस्वस्थ झाले; कारण त्यांच्या पारंपरिक मतपेटीतूनच जाधव यांनी ही मते घेतली होती. त्यात विभागणी झाल्याने त्यांना एका टप्प्यावर विजयासाठी झगडावे लागले. टोलमुक्ती आंदोलनात आमदार क्षीरसागर सुरुवातीपासूनच पुढे आहेत; परंतु आता त्यांच्याच पक्षाचे सरकार सत्तेत आहे. पालकमंत्री पाटील ‘एमएच-०९’ वाहने टोलमुक्त करण्याचा प्रस्ताव मांडतात व त्याला क्षीरसागर लगेच विरोध करून रस्त्यावर उतरण्याची भाषा करतात, हेदेखील धुसफुशीचे महत्त्वाचे कारण आहे. अशा साचलेल्या घडामोडी या दोन पक्षांची महापालिकेत युती करताना आड येत आहेत. त्यात बुधवारी (दि. १०) क्षीरसागर यांनी थेट भाजपच्या राष्ट्रीय पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावर हल्ला चढविल्याने त्याचीही दखल भाजपच्या राज्य नेतृत्वाने घेतली असल्याचे सांगण्यात आले. त्या संदर्भात भाजपने थेट कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही असे ठरविले असले तरी भाजपच्या अधिवेशनावर टीका करण्याचा क्षीरसागर यांना अधिकार व गरजही नव्हती, अशी प्रतिक्रिया काही पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखविली. भाजपने युती करावी की नाही, हे ठरविण्याचे अधिकार पालकमंत्री पाटील यांना आहेत; परंतु शिवसेनेत तसे अधिकार आमदार क्षीरसागर यांना स्थानिक पातळीवर नाहीत. हा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच घेतील. त्यामुळे युतीवरून एकमेकांना शड्डू मारणे संयुक्तिक नाही, असे भाजपला वाटते. (प्रतिनिधी)कोल्हापूर ‘उत्तर’ मतदारसंघातील २०१४ मधील मतदानआमदार राजेश क्षीरसागर (शिवसेना): ६९ हजार ७३६सत्यजित कदम (काँग्रेस): ४७ हजार ३१५महेश जाधव (भाजप): ४० हजार १०४आर. के. पोवार (राष्ट्रवादी): ९ हजार ८८७रघू कांबळे (भाकप): १५०४सुरेश साळोखे (मनसे): १२८०डी. श्रीकांत (बसप): ११२० स्वबळावर लढण्याची भाजपची भाषाशिवसेनेचे या भाषेला प्रत्युत्तरअनेकजण भाजपच्या संपर्कातक्षीरसरसागर व पाटील यांच्यात वाद