जिल्ह्यातील सर्व भटक्या कुत्र्यांना अँटी रेबिज लस देण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:55 IST2021-02-05T06:55:15+5:302021-02-05T06:55:15+5:30
शहरासह जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्याच्या घटनेत वाढ होत आहे. कोल्हापूर महापालिकेने भटक्या कुत्र्यांची संख्या कमी होण्यासाठी निर्बिजीकरणाची माेहीम सुरू ...

जिल्ह्यातील सर्व भटक्या कुत्र्यांना अँटी रेबिज लस देण्याची गरज
शहरासह जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्याच्या घटनेत वाढ होत आहे. कोल्हापूर महापालिकेने भटक्या कुत्र्यांची संख्या कमी होण्यासाठी निर्बिजीकरणाची माेहीम सुरू केली आहे. परंतु, या माेहिमेला अपेक्षित यश येत नाही. त्यामुळे भटक्या कुत्र्यांनाच थेट अँटी रेबिज लस देण्याचा निर्णय घेतला आहे. लस दिलेले कुत्रे ओळखण्यासाठी त्याच्या गळ्यात पट्टा घातला जाणार आहे. यासाठी चार पथके नियुक्ती केले असून, १ फेब्रुवारीपासून लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. शहरालगतच्या गावातील भटकी कुत्री शहरात येतात. महापालिकेची लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी शहरालगतच्या भटक्या कुत्र्यांचेही लसीकरण होणे तितकेच महत्त्वाचे आहे.
चौकट
अँटी रेबिज लस कशासाठी
भटकी कुत्री एकमेंकाला चावल्यामुळे त्यांना रेबिज होतो. रेबिज झालेली कुत्री आक्रमक होऊन नागरिकांचा चावा घेतल्यास संबंधित नागरिकाला रेबिज होण्याचा धोका असतो. यामुळे भटक्या कुत्र्यांनाच रेबिज होऊ नये यासाठी अँटी रेबिज लस देणे पर्याय पुढे आला आहे.