अलबादेवी ग्रामस्थांचे रस्त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:10 IST2021-02-20T05:10:42+5:302021-02-20T05:10:42+5:30

तसेच ग्रामस्थांचे श्रध्दास्थान असलेल्या रायीच्या मंदिराकडे जाणारा रस्ता व त्यावरील मोरीची दुरूस्ती करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. हेरे ...

Albadevi villagers approached the district collector for the road | अलबादेवी ग्रामस्थांचे रस्त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

अलबादेवी ग्रामस्थांचे रस्त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

तसेच ग्रामस्थांचे श्रध्दास्थान असलेल्या रायीच्या मंदिराकडे जाणारा रस्ता व त्यावरील मोरीची दुरूस्ती करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. हेरे सरंजाम वर्ग दोन जमिनीसंदर्भात ऐतिहासिक क्रांतिकारी निर्णय घेऊन शेतकरी वर्गाला दिलासा दिल्याबद्दल यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचा अलबादेवी ग्रामस्थांमार्फत सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना याप्रकरणी लक्ष घालण्यास सांगितले.

यावेळी माजी राज्यमंत्री भरमू पाटील, सभापती ॲड आनंद कांबळे, जि. प सदस्य सचिन बल्लाळ, माजी जि. प. सदस्य तात्यासाहेब देसाई, नगरसेवक दिलीप चंदगडकर, सत्तेवाडी उपसरपंच प्रदीप साबळे, संतोष इंगवले, नामदेव नार्वेकर, परशराम चौकुळकर उपस्थित होते.

फोटो ओळी:--

अलबादेवी ता. चंदगड येथील रस्त्यासंदर्भात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन देताना माजी मंत्री भरमुआण्णा पाटील, श्रीकांत नेवगे, नगरसेवक चंदगडकर.

Web Title: Albadevi villagers approached the district collector for the road