लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : वर्षातील साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयेला कोल्हापूरकरांनी खरेदीचा उत्सव साजरा केला. सोने, मोबाइल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तु, दुचाकी-चारचाकी वाहने, होम अप्लायन्सेस यांसह गृहखरेदी, गृहप्रवेश अशा शुभकार्यांना प्राधान्य देण्यात आले. यानिमित्ताने युद्धाची झळ सहन करत असलेल्या बाजारपेठेला अक्षय्य तृतीयेला झालेल्या खरेदी व उलाढालीने बूस्टर डोस मिळाला.
अर्धा मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयेला केलेले कोणतेही शुभकार्य किंवा खरेदी ही कुटुंबासाठी लाभदायक असते. सुख-समृद्धीचा कधी क्षय होत नाही अशी श्रद्धा आहे. त्यामुळे नागरिक वर्षभर पैसे साठवून या दिवसांमध्ये खरेदीला प्राधान्य देतात. गेल्या दोन महिन्यांपासून अमेरिका-इस्राईल व इराणसह आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम भारतीय बाजारपेठेवरदेखील झाला आहे. उलाढाल कमी झाली आहे. कोल्हापुरातील व्यावसायिकांचीही स्थिती काही वेगळी नाही, मात्र अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्ताला केल्या गेलेल्या खरेदीमुळे बाजारपेठेतील घसरणीला थोडा ब्रेक लागला. थंडावलेली खरेदी पुन्हा सुरू झाली. जिल्ह्यात कोट्यवधींची उलाढाल झाल्याने व्यावसायिकांनाही दिलासा मिळाला.
एसी, कूलरचा थंडावा
दरवर्षीपेक्षा यंदा उन्हाळ्याची तीव्रता अधिक असल्याने अक्षय्य तृतीयेला नागरिकांनी एसी व कूलरच्या खरेदीला अधिक पसंती दिली. यासह फ्रीज, एलईडी, वॉशिंग मशीन, ओव्हन या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली.
मोबाइलची कायमच चलती
अन्य कोणत्याही वस्तूंपेक्षा मोबाइल फोन खरेदीला सर्वाधिक गर्दी होती. यानिमित्त मोबाइल खरेदीवर आकर्षक सूट, मोफत अॅक्सेसरीज, कॅशबॅक, शून्य टक्के व्याजाने कर्ज, आकर्षक गिफ्ट, अशा विविध योजना कंपन्यांनी जाहीर केल्या होत्या, त्याचा फायदा घेत तरुणाईने मोबाइल खरेदीला प्राधान्य दिले.
चोख सोने खरेदी
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्ताला शहरातील बँडेड दागिन्यांच्या शोरूमसह गुजरीतील सराफ व्यावसायिकांकडे ग्राहकांनी गर्दी केली होती. सोन्याने दीड लाखाचा टप्पा पार केल्याने नागरिकांनी गुंतवणुकीचा पर्याय म्हणून चोख सोने, वळे, बिस्कीट, नाण्याची खरेदी केली. तसेच, विवाहासाठी कानातले, लहान-मोठे मंगलसूत्र, गंठण, नेकलेस, हार, बांगड्या अशा दागिन्यांचीही खरेदी केली गेली. यामध्येही कमी वजनाच्या दागिन्यांना अधिक मागणी होती.
१ लाख पन्नास हजारांचा टप्पा सोन्याने पार
केल्याने यात गुंतवणूक करण्यासाठी नागरिकांनी चोख सोने, वळे, बिस्कीट, नाण्याची खरेदी जोरात केली.
Web Summary : Kolhapur celebrated Akshaya Tritiya with enthusiastic buying. Gold, electronics, vehicles, and home appliances saw high demand. This boosted the market, offsetting war-related slowdown, and providing much-needed relief to local businesses with crores in transactions.
Web Summary : कोल्हापुर में अक्षय तृतीया पर जमकर खरीदारी हुई। सोना, इलेक्ट्रॉनिक्स, वाहन और घरेलू उपकरणों की मांग बढ़ी। इससे युद्ध के कारण आई मंदी कम हुई और व्यापारियों को राहत मिली, करोड़ों का कारोबार हुआ।